पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाला. बी. ई. (ऑनर्स), एम.एस. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए) मधून त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात पंडीत जवाहरलाल नेहरूंचे सहकारी होते तर आई प्रेमलाकाकी चव्हाण या माजी खासदार होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधून १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य देखील होते. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेसचे ते १९७३ पासून सदस्य आहेत. १९९१ मे १९९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९९१-९६ दरम्यान ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समितीचे सदस्य होते १९९४-९६ दरम्यान ते वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समितीचे सदस्य होते. १९९५-९६ दरम्यान सार्वजनिक उपक्रम समितीचे ते सदस्य होते. १९९६-९७ दरम्यान ते ११ व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य होते.

एप्रिल २००२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. एप्रिल २००८ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. त्यांना कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन (अतिरिक्त कार्यभार), राज्यमंत्रीपद देण्यात आलं. २००४-२००९ व मे २००९ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत ते पंतप्रधान, कार्यालयाचे राज्यमंत्री होते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी देखील होते. महाराष्ट्राचे ते २६ वे मुख्यमंत्री होते. ११ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. २८ एप्रिल २०११ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला होता.

आणखी बातम्या

पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर?

पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर?

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Apr 03, 2024, 17:57 PM IST
Ajit Pawar Revel Secret On Prithviraj Chavan And Targeted Sharad Pawar

पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्रिपद आम्ही वाचवले, अजित पवारांचा गौप्यस्फोट

पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्रिपद आम्ही वाचवले, अजित पवारांचा गौप्यस्फोट

Dec 12, 2023, 14:05 PM IST
'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

'काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षण...' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation : काँग्रेस सरकार टिकलं असतं तर मराठा आरक्षणही टिकलं असतं असं मोठं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. यावर सत्ता गेली म्हणून आरक्षणही गेलं हे न पटणारं विधान

Nov 28, 2023, 16:28 PM IST
'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!

'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!

Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.

Sep 02, 2023, 00:08 AM IST
Maharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!

Maharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!

Maharastra Politics, Leader of Opposition: काँग्रेसच्या वतीनं 6 नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहेत. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार

Jul 17, 2023, 22:57 PM IST
Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य!

Sharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य!

Prithviraj Chavan, Maharastra politics: अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण

Jul 09, 2023, 19:10 PM IST
काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Karnataka Election Result :  कर्नाटक निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या निवडणुकीत जनता दल (एस) यांची 5 टक्के मते घटली. त्याचा फायदा

May 13, 2023, 12:43 PM IST
Maharashtra MLA Disqualification : फेसबुक लाईव्ह व्यासपीठ नव्हतं... पृथ्वीराज चव्हाणाचं उद्धव ठाकरेंबाबतचे 'ते' भाकित ठरलं खरं!

Maharashtra MLA Disqualification : फेसबुक लाईव्ह व्यासपीठ नव्हतं... पृथ्वीराज चव्हाणाचं उद्धव ठाकरेंबाबतचे 'ते' भाकित ठरलं खरं!

Maharashtra MLA Disqualification : गेल्या 11 महिन्यांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा

May 11, 2023, 17:03 PM IST