मुंबई : देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अब्जाधीश हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहता सोबत झाला. हा साखरपुडा समारंभ २४ मार्च रोजी गोव्यात संपन्न झाला. गोव्यात पार पडलेल्या या सेरेमनीनंतर अंबानी यांनी मुंबईत एक ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींसह क्रिकेटर्सनेही हजेरी लावली.
ऐश्वर्या राय बच्च्न तिच्या मुलीसह अंबानीच्या घरी आयोजित पार्टीमध्ये पोहचली होती. या पार्टीला आराध्या बच्चनने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता.
आराध्या बच्चन ही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते. या शाळेच्या संस्थापिका आणि चेअरपर्सन नीता अंबानी आहेत. मुकेश अंबानीच्या आई कोकिलाबेन या आराध्याशी फार जवळ आहेत. त्यांचं उत्तम बॉन्डिंग आहे.
आराध्याला चॉकलेट, टॉफी काहि गिफ्ट आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले. एरवीदेखील जेव्हा आराध्या अंबानी कुटुंबीयांना भेटते तेव्हादेखील तिला चॉकलेट मिळते.
पार्टीनंतर मीडिया समोर फोटो काढण्यासाठी आकाश आणि श्लोका बाहेर आले. मात्र, दूर असल्याने फोटोग्राफर्सने आकाश आणि श्लोकाला विनंती करत पुढं येण्याची विनंती केली. त्यानंतर आकाश अंबानीने पुढं येत पोज दिली. यावेळी आकाशने फोटोग्राफर्सला असं काही म्हटलं जे ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. देशातील सर्वात श्रीमंत परिवारातील मुलाने फोटोग्राफर्सला म्हटलं 'चांगला फोटो छापा हा".