अमेरिकेत शिफ्ट होणार बच्चन घराण्याची लाडकी लेक आराध्या? मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा

Aaradhya Bachchan will Move to America : आराध्या बच्चन लवकरच होणार अमेरिकेत शिफ्ट! मीडिया रिपोर्ट्समध्ये केला दावा

दिक्षा पाटील | Updated: Mar 28, 2024, 05:54 PM IST
अमेरिकेत शिफ्ट होणार बच्चन घराण्याची लाडकी लेक आराध्या? मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा title=
(Photo Credit : Social Media)

Aaradhya Bachchan will Move to America : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत काही कुटुंब आहेत जे चांगलेच चर्चेत राहतात. त्या चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक बच्चन कुटुंब आहे. बच्चन कुटुंबाचे कोणतेही फोटो आले किंवा काही झालं तरी ते चर्चेत येतात. सध्या अमिताभ बच्चन यांच कुटुंब आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, ते कारण म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्या हे त्यांची लेक आराध्या बच्चनसोबत परदेशात राहणार आहेत. 

आराध्याविषयी बोलायचे झाले तर ती लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. आराध्यानं लोकप्रियतेच्या बाबतीत मोठ्या-मोठ्या कलाकारांना देखील मागे टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी आराध्याचा धुळवड खेळतानाचा फोटो समोर आला होता. आराध्याचे फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले होते. असं म्हटलं जातं की ही होळी बच्चन कुटुंबासाठी खूप खास होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  त्याचं कारण आहे की ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या लेकीच्या भविष्यासाठी एक मोठा निर्णय घेत आहेत. असे म्हटले जाते की आराध्या बच्चन तिच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकते. असं म्हटलं जातं की ऐश्वर्या रायला यावेळी म्हणजेच आराध्याची यंदाची होळी काही खास करायची होती. कारण आराध्या काही वर्ष परदेशात राहून पुढचं शिक्षण पूर्ण करण्याची शक्यता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता असं म्हटलं जातं की येणाऱ्या काळात सत्य काय आहे ते सगळ्यांसमोर येईल. सध्या आराध्या ही तिचं छालेय शिक्षण हे मुंबईच्या धीरुभाई अंबानी शाळेत सुरु आहे. अशी देखील माहिती आहे की या वर्षीची परिक्षा संपल्यानंतर आराध्या ही 10 वीत जाणार आहे आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ती न्यूयॉर्कला जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : 'ऐश्वर्या रायचं वजन वाढलं तेव्हा...' बिग बींच्या सुनेनं इतकं सहन केलं! रवीनाचा धक्कादायक खुलासा

ऐश्वर्या आणि अभिषेकविषयी बोलायचे झाले तर 20 एप्रिल 2007 मध्ये त्या दोघांचे लग्न झालं. त्यांच्या लग्नात फक्त काही जवळचे लोक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. ते दोघं त्यांचं खासगी आयुष्य खासगी ठेवण्यासाठी प्राधान्य देतो. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्या रायनं एका मुलीला जन्म दिला असून तिचंच नाव आराध्या आहे. आराध्या विषयी बोलायचे झाले तर ती तिच्या आई-आजोबांची लाडकी आहे. संपूर्ण कुटुंबाचा खूप छान बॉन्डिंग आहे. आराध्या यावर्षी तिचा 13 वा वाढदिवस साजरा करणार आहे आणि त्यासोबत ती टीनएजमध्ये दाखल होणार आहे.