Actor Rich Rotella : असे अनेक लोक आहेत ज्यांना आपली उंची थोडी जास्त असायला हवी होती अशी इच्छा असते. मात्र, एका वयानंतर कोणत्याही व्यक्तीची उंची वाढणं थांबते. इतकंच काय तर अभिनय किंवा मॉडेलिंग क्षेत्रात उंचीला खूप महत्त्वाचे असते. नुकतंच एका हॉलिवूड अभिनेत्याने वयाच्या 38 व्या वर्षी आपली उंची वाढवली आहे. रिच रोटेला (Rich Rotella) असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. त्याने वयाच्या 38 व्या वर्षी आपली उंची चक्क 3 इंच वाढवण्यासाठी तब्बल 85 लाख रुपये खर्च केले. मात्र, उंची वाढवण्याची प्रक्रिया अत्यंत वेदनादायक असल्याचे सांगितले आहे. व्यक्तीची उंची वाढवणारी लेग लॅथिंग सर्जरी नक्की कशी काम करते चला जाणून घेऊया...
अमेरिकेत राहणारा अभिनेता रिच रोटेला त्यांचा लहान उंचीमुळे चिंतेत होता. त्याची उंचीही 5 फूट 5 इंच होती. तो त्याचा इतर कलाकार आणि मित्रांपेक्षा लहान दिसायचा. याचं त्याला नेहमी वाईट वाटायचे. त्यानंतर त्यानं लेग लेन्थनिंग सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. पाय लांब करण्याच्या शस्त्रक्रियेद्वारे रिचनं आपली उंची 3 इंच वाढवली आहे. शस्त्रक्रियेनंतर तो म्हणाला की, आता मुलींना डेट करणे आणि अभिनय करणे सोपे झाले आहे. त्याची उंची त्याच्या स्वप्नाना पूर्ण करण्यासाठी एक अडथळा ठरली होती. त्याचे प्रसिद्ध अभिनेता बनण्याचे स्वप्न होते. पण कमी उंचीमुळे चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, रिचनं वयाच्या 38 व्या वर्षी उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. रिचनं त्याची उंची वाढवण्यासाठी चक्क 85 लाख रुपये खर्च केले. आता यामुळे नक्कीच त्याची स्वप्न पूर्ण होतील असे त्याला वाटू लागले आहे. रिचनं त्याची सर्जरी कशी झाली याविषयी खुलासा केला आहे. तो म्हणाला की, सर्जरीची संपूर्ण प्रक्रिया ही खूप वेदनादायक आणि आर्थिकरित्या महाग होती. सर्जरीनंतर मी बराचकाळ हा व्हीलचेअरवर होतो. सर्जरी झाल्यानंतर मी 3 महिने घरीच होतो. सुरुवातीला मी काठीच्या सहाय्यानं पायावर उभा राहिलो आणि काही दिवसात मी हळू हळू चालायला सुरुवात केली होती. आता रित कोणत्याही मदतीशिवाय चालू शकतो. दरम्यान, अजूनही त्याच्यावर फिजिओथेरपी सुरु आहे.
लेग लाँगनिंग सर्जरीच्या मदतीनं पायांची लांबी 3 इंच ते 6 इंचांपर्यंत वाढवता येते. या शस्त्रक्रियेत डॉक्टर रुग्णांच्या मांडीचे हाड तोडतात आणि नंतर त्याजागी धातूच खिळे लावतात. यानंतर चुंबकीय रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने हे जोडण्यात येतात. तीन महिन्यांसाठी ते दररोज थोडे मोठे होतात. हाडे हळूहळू लांब होण्यास बराच वेळ लागतो. रुग्णाचे पाय बरे होण्यासाठी काही महिने लागू शकतात. एक इंच लांबी वाढण्यास सुमारे 25 दिवस लागतात. तीन इंच लांबी वाढवण्यासाठी अडीच ते तीन महिने लागतात. उंची किती वाढवायची यावर या शस्त्रक्रियेचा खर्च अवलंबून असतो. 60 लाख रुपयांपासून 1 कोटी 20 लाखांपर्यंत खर्च होऊ शकत.