मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या मदतीनं बऱ्याच नव्या चेहऱ्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. अशाच नवोदितांपैकी काही चेहरे सलमानसाठी अतिशय खासही ठरले आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री शहनाज गिलचं. रिअॅलिटी शो, सलमानच्या घरची पार्टी या अशा कारणांमुळे अभिनेत्याची Favorite असणारी शहनाज सध्या अडचणीत सापडली आहे. कारण, तिच्या वडिलांवरच मोठं संकट ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. (Actress shehnaaz gills father gets death threat)
शहनाजचे (shehnaaz gill) वडील संतोक सिंह सुख यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. एका परदेशी क्रमांकावरून आलेल्या फोनवरून त्यांना धमकावण्यात आलं. दिवाळीपूर्वी संपवण्याची धमकी त्यांना देण्यात आली. ब्यासहून तरान्तरन जातेवेळी शहनाजच्या वडिलांना फोन आला आणि तेव्हाच ही धमकी मिळाली.
शिवराळ शब्दांचा वापर केल्यानंतर या युवकानं दिवाळीच्या आधी तुम्हाला घरात घुसून मारेन अशी धमकी दिली आणि एकच खळबळ माजली. सदर प्रकरणी संतोक यांनी पोलिसांत तक्रारही केली.
यापूर्वीही शहनाजच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 2021 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 25 डिसेंबरला त्यांच्यावर दोन अनोळखी इसमांनी हल्लाही केला होता. यांनी संतोक यांच्यावर गोळ्या झाडल्या होच्या. अमृतसरमध्येच ही घटना घडली होती. या घटनेतून ते थोडक्यात बचावले होते.
शहनाजशी असणारं नातं बेताचं...
शहनाज आणि तिच्या वडिलांचं नातं बेताचं आहे. सुरुवातीला त्यांनी लेकिला पाठिंबा दिला होता. पण, नंतर मात्र त्यांनी तिच्याविषयी बरंवाईट बोलण्यास सुरुवात केली. एका वळणावर ते मुलीवर इतके संतापले की तिच्याशी परत कधीच बोलणार नाही असंही सांगितलं.