मुंबई : कलाविश्वात नशिब आजमावल्यानंतर अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिनं सोशल मीडियाकडे आपला मोर्चा वळवला. उर्मिलाच्या नुसत्या बोलण्यानं आणि तिच्या वावरण्यानंच चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येऊ लागलं. अशा या अभिनेत्रीच्या आयुष्यात वर्षभरापूर्वी मोठी घटना घडली. (Actress urmila nimbalkars brother vaibhav nimbalkar shares horrifying memory see photo)
अभिनेत्रीचा मोठा भाऊ, आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांच्यावर अशी परिस्थिती ओढावली की त्यांनी मृत्यू अगदी जवळून पाहिला.
नेमकं काय झालं होतं?
साधारण वर्षभरापूर्वी आसाम- मिझोरम सीमावादावरुन (Assam-Mizoram Clash) प्रकरण इतकं पेटलं की, (Assam-Mizoram Clash ) मिझोरमच्या सीमाभागात असणाऱ्या लायलापूर भागात आसाम पोलीस विभागात काम करणारे 5 पोलीस जवान शहीद झाले. यामध्ये cachar जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर (vaibhav nimbalkar) जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत आणि त्यानंतर उपचारासाठी शहरामध्ये आणण्यात आलं.
अनेकांच्या प्रार्थना, सदिच्छांच्या बळावर निंबाळकर यांनी या संकटावर मात केली. संकटांच्या नाकावर टिच्चून ते उभे राहिले आणि अनेकांसाठीच पुन्हा एकदा प्रेरणास्त्रोत ठरले.
आपल्यावर झालेल्या या आघाताची भयावह आठवण आणि मिळालेल्या दुसऱ्या जन्माचं महत्त्वं जाणत खुद्द निंबाळकर यांनीच एक सोशल मीडिया पोस्ट केलीय. या माध्यमातून त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या असंख्य हितचिंतकांचे आभारही मानले.
मोठ्या भावानं ज्या पद्धतीन संकटाला तोंड दिलं हे पाहताना त्याच्या या दुसऱ्या जन्मासाठी उर्मिलानंही कृतज्ञता व्यक्त करत इन्स्टा स्टोरी शेअर केली.