मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स केस प्रकरणी 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने ताब्यात घेतलं होतं.अखेर 26 दिवसांनंतर आर्यन जेलमधून बाहेर आला आहे. आर्यन बाहेर आल्यामुळे शाहरुख, गौरी आणि त्यांचे चाहते आनंदी आहे. आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर समस्त बॉलिवूडकरांनी आर्यनचं समर्थन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. पण शाहरुखच्या सहकलाकाराने त्याला आता तरी मुलांना सांभाळ... असा सल्ला दिला आहे. अभिनेत्याचं असं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
अभिनेता पियुष मिश्राने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखला सल्ला दिला आहे. पियुष म्हणाला, 'माझ्या प्रतिक्रिया काय असेल? त्याने केलं... त्याला बेल मिळाली... बाहेर तो आला... आता याबद्दल शाहरुख आणि त्याचा मुलगा बघून घेईल... समीर वानखेडे बघून घेतील... जे काही आहे ते ठीक आहे.. आता फक्त तुझ्या मुलांना नीट सांभाळ...' पियुषचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
सांगायचं झालं तर, पियुष शर्मा आणि शाहरुखने 1998 साली 'दिल से' चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. चित्रपटात पियुषने सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.