Triptii Dimri Fees for Bhool Bhulaiyaa : 'अॅनिमल' या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री तृप्ती डिमरीला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर तृप्तीला अनेक ऑफर देखील येऊ लागल्या आहेत. तिला अनेक जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूलभुलैया 3' आहे. या चित्रपटासाठी तृप्तीनं किती मानधन घेतलं याची चर्चा सुरु झाली आहे.
'भूलभुलैया 3' या थ्रिलर चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या तृप्ती डिमरीनं तिच्या मानधनात वाढ केली आहे. पण ही वाढ काही टक्क्यांमध्ये नाही तर चक्क दुप्पट केली आहे. तर असं म्हटलं जातं की 'अॅनिमल' या चित्रपटासाठी तृप्ती डिमरीनं 40 लाख रुपये मानधन म्हणून घेतले होते. आता 'भूलभुलैया 3' या चित्रपटासाठी तिनं 80 लाख रुपये मानधन घेतलं आहे. या आधी 'भूलभुलैया 2' साठी कियारानं 4 ते 5 कोटी मानधन घेतलं होतं. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात विद्या बालन देखील दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात विद्या बालन देखील दिसणार आहे.
त्याशिवाय तृप्ती ही दाक्षिणात्य चित्रपटात देखील दिसणार आहे. तर दाक्षिणात्य चित्रपटाविषयी सांगायचे झाले तर ती अभिनेता प्रभाससोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव स्प्रिट आहे असं म्हटलं जातं. तृप्ती डिमरीच्या तुलनेत कार्तिक आर्यनचं मानधन किती आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर कार्तिक आर्यननं 45 ते 50 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. अजून मानधनाच्या बाबतीत तृप्ती ही कोटींच्या घरात पोहोचली नाही मात्र, तिच्या मानधनाच्या आकड्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे. तिच्यासाठी असलेली ही चांगली करिअर ग्रोथ आहे असं म्हणता येईल. याशिवाय तृप्तीही 'अॅनिमल' च्या दुसऱ्या भागातही दिसणार आहे. 'अॅनिमल' या चित्रपटामुळे तिला भाभी नंबर 2 अशी ओळख मिळाली.
हेही वाचा : 4 कोटीचं बजेट असणाऱ्या चित्रपटानं केली 100 कोटींची कमाई, 2024 मध्ये सुपरहिट ठरला 'हा' सिनेमा
तृप्तीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'बुलबुल', 'कला', 'लैला मजनू', 'पोस्टर बॉईज', 'मॉम' या चित्रपटांमध्ये दिसली. तर त्याशिवाय ती लवकरच 'मेरे मेहेबूब मेरे सनम', 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटात देखील दिसणार आहे.