मुंबई : स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीने शनिवारी रात्री रिअॅलिटी शो 'लॉक अप' जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केलं. कंगना राणौतच्या 'लॉक अप' शोमध्ये, मुनव्वर फारुकीने त्याची सहकारी स्पर्धक पायल रोहतगी आणि अंजली अरोरा यांना पराभूत करून शोची ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली.
'लॉक अप' विजेता मुनावर ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या प्रवासाबद्दल बोलला. हिंदू देवांचा अपमान केल्याबद्दल जेलमध्ये गेलेल्या कॉमेडियनचं म्हणणं आहे की, त्याच्यासाठी रिअल लॉकअपपेक्षा हे सोपं होतं.
भोपाळ येथे अटक करण्यात आली
मुनव्वरने स्टँड-अप कॉमेडियन आणि YouTuber म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2 जानेवारी 2021 रोजी त्याला भोपाळमध्ये एका कॉमेडी शोसाठी अटक करण्यात आली तेव्हा तो चर्चेत आला होता. ज्यामध्ये त्याने परफॉर्म देखील केला नव्हता. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. शो जिंकल्यानंतर आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर एका मुलाखतीत म्हणाला.
कसं होतं खरं लॉक-अप?
कोणत्या खऱ्या लॉक-अपला सामोरं जाणं कठीण आहे असं विचारलं असता. कॉमेडियनने सांगितलं की, खरं लॉकअपच्या तुलनेत हे अर्धा टक्काही नव्हतं. यामध्ये कोणीही तुमचा अपमान करत नाही. तो एक खेळ होता. चाहत्यांना मुनव्वरबद्दल अनेक माहिती मिळाली आणि काही घटनांनी सर्वांनाच भावूकही केलं.