मुंबई : 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. या मालिकेतील कलाकारांवर येणारे ‘मिम्स’ देखील व्हायरल होत आहेत.
मालिकेत आतापर्यंत बरीच गोष्टी घडून गेल्या, सोहम चं वागणं, असावारीच त्याला पाठीशी घालणं, शुभ्राची घर सांभाळताना होणारी तारेवरची कसरत. पण आता सोहम आणि शुभ्राची पहिली ॲनिव्हसरी येतेय, दोघांच्याही घरचे ॲनिव्हसरी साजरी करण्याच ठरवतायत जेणेकरून शुभ्रा आणि सोहम ह्यांच्यातील वाद मिटून दोघे एकत्र येतील. आसावरी शुभ्राला मंगळसूत्र न घालण्यावरून पुन्हा टोकते. शेवटी शुभ्रा आसावरीसाठी ॲनिव्हसरीच्या सोहळ्यात सोहमच्या हातून मंगळसूत्र घालून घेण्याचा निर्णय घेते.
सोहोळ्यासाठी घरी आलेल्या सर्व मंडळींना सोहम घराबाहेर जायला सांगतो, आणि शुभ्रावर मंगळसूत्र घालण्याची जबरदस्ती करतो काय होईल जेव्हा असावरील कळेल त्या मंगळसुत्रामागचं सत्य ? आसावरी कोणाच्या बाजूने उभी राहील सोहमच्या कि शुभ्राच्य? पाहायला विसरू नका हा High Voltage Drama सोमवार ते रविवार रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.