प्रेग्नंट आलिया चिकनी चमेलीच्या डान्सवर थिरकली, Video व्हायरल

अभिनेत्री आलियाचा व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Updated: Sep 9, 2022, 07:33 PM IST
प्रेग्नंट आलिया चिकनी चमेलीच्या डान्सवर थिरकली, Video व्हायरल title=

Chikni Chameli Song Brahmastra : बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आणि मोठे कलाकार असलेला ब्रह्मास्त्र चित्रपट (Brahmastra Movie) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची अनेक वर्षांपासून सर्वांना प्रतीक्षा होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र  (Chikni Chameli Song Brahmastra)

ब्रह्मास्त्र चित्रपटाचा एक व्हिडिओ लीक झाला आहे ज्यामध्ये रणबीर-आलिया कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली' या हिट गाण्यावर स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. कतरिनाच्या गाण्यावर मुलांसोबत डान्स करताना काळ्या कपड्यांमध्ये आलियाही तुम्हाला दिसत आहे. त्याचवेळी रणबीर आधी तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि नंतर तोही तिच्यासोबत अभिनेत्रीसोबत नाचू लागतो. रणबीर आणि आलियाची सुंदर बाँडिंग चाहत्यांना खूप आवडली आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगला 2017 मध्ये सुरुवात झाली होती. आता या चित्रपटाची सर्वांची प्रतीक्षा संपली आहे. उत्तम VFX आणि थ्रिलने भरलेला हा चित्रपट तुम्ही 3D आणि IMAX 3 मध्ये पाहू शकता. 

ब्रह्मास्त्र चित्रपटाला चित्रपट समीक्षकांकडून चांगलं रेटिंग मिळालं आहे. पहिल्या दिवशी ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर 15-20 कोटींची बंपर कमाई करू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.