मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन वयाची पंचाहत्तरी पार केलेली असली तरीही तरूणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करत आहेत. सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'नॉट आऊट 102' या चित्रपटासाठी काम करत आहे. दरम्यान त्यांच्या फोनचं नेटवर्क काम करत नसल्याने त्यांनी मध्यरात्री संबंधित कंपनीकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली.
अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्विटनुसार व्होडाफोनचं नेटवर्क मोबाईलमध्ये 4 G नेटवर्क दाखवत होते. मात्र कोणताच मेसेज जात नव्हता. त्यामुळे ऐन मध्यरात्री बीग बींनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत तक्रार नोंदावली.
काही वेळातच पुन्हा नेटवर्क आल्यानंतर त्यांनी अखेर त्यांनी माझं ऐकलं असं म्हणत पुन्हा ट्विट केले.
नुकतेच ऋषी कपूर यांनी '102 नॉट आऊट' या चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन दोघेही खास अंदाजामध्ये दिसत आहेत.
'अमर अकबर अॅंथेनी' या सुपरहीट हिंदी सिनेमानंतर तब्बल 27 वर्षांनी ऋषी कपूर पुन्हा अमिताभ बच्चनसोबत झळकणार आहेत. 'अमर अकबर अॅंथेनी' या चित्रपटामध्ये एकमेकांपासून दुरावलेले भाऊ या रूपात दिसलेले ऋषी कपूर आणि बीग बी आता '102 नॉट आऊट' मध्ये मुलगा आणि वडील अशा भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' म्हणत ऋषी कपूरनी शेअर केलं '102 नॉट आऊट'चं पोस्टर