ज्या कार्यक्रमातून अनेक कोट्यधीश होतात, त्याच 'कौन बनेगा करोडपती' साठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात माहितीये का? आकडा जाणून उडून जाल

'कौन बनेगा करोडपती' चं सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. 

Updated: Aug 18, 2022, 05:07 PM IST
ज्या कार्यक्रमातून अनेक कोट्यधीश होतात, त्याच 'कौन बनेगा करोडपती' साठी अमिताभ बच्चन किती मानधन घेतात माहितीये का? आकडा जाणून उडून जाल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चा 14 पर्वाचे सुत्र संचालन करत आहेत. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारताना दिसतात. सगळ्यांचे मनोरंजन करत अमिताभ 'कौन बनेगा करोडपती'चं सुत्रसंचालन करतात. पण या शोसाठी अमिताभ किती मानधन घेतात या विषयी माहितीये का? 

आणखी वाचा : किंग कोब्राचा मुलाला दंश, त्या नंतर जे घडलं, त्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही; पाहा Video

अमिताभ हे 2000  सालापासून कौन बनेगा करोडपतीचं सुत्रसंचालन करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ यांनी 7.5 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे म्हटले जाते. दरम्यान, या आधी अमिताभ यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वासाठी 2 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले होते. त्यानंतर सातव्या सीझनपासून अमिताभ 7 कोटी रुपये मानधन म्हणून घेत होते. तर आता अमिताभ 7.5कोटी रुपये मानधन म्हणून घेत आहेत. 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : कोणते दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले? R. Madhavan च्या वक्तव्यानं पेटू शकतो नवा वाद

अमिताभ लवकरच प्रभाससोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक नाग अश्विनच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात दीपिकाही मुख्य भूमिकेत आहे. दीपिका पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. प्रभास, दीपिका आणि बिग बी यांच्याशिवाय या चित्रपटात दिशा पटानी देखील आहे. याशिवाय बिग बी ‘ब्रह्मास्त्र’मध्येही दिसणार आहे. अमिताभ यांच्याशिवाय या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘ब्रह्मास्त्र भाग एक: शिव’ ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.