Aryan Khan Drugs Case : हृतिक रोशनकडून आर्यन खानप्रकरणी लक्षवेधी व्हिडीओ पोस्ट

पाहा नेमकं झालं तरी काय... 

Updated: Oct 28, 2021, 02:45 PM IST
Aryan Khan Drugs Case : हृतिक रोशनकडून आर्यन खानप्रकरणी लक्षवेधी व्हिडीओ पोस्ट  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं ताब्यात घेतलं. ज्यानंतर त्याच्यापुढं सातत्यानं काही अडचणी उभ्या राहत गेल्या. दर दिवसागणिक आर्यनची कोठडी वाढत गेली आणि आता त्याचा जामीन अपेक्षेपेक्षा अधिक लांबणीवर पडला आहे. (Aryan khan, Shahrukh Khan)

एकिकडे आर्यन खानचा जामीन लांबणीवर जात असतानाच दुसरीकडे शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला कलाविश्वातून धीर देण्याचं काम सुरु आहे. 

हृतिकनं इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये वरिष्ठ पत्रकार फे डिसूजा सर्वोच्च न्यायालयातील वकील दुष्यंत दवे यांच्यासोबत आर्यनच्या जामीन प्रकरणावर चर्चा करताना दिसत आहेत. 

या व्हिडीओमध्ये काही धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या मार्फत काही असे खुलासे होत आहेत जे भुवया उंचावणारे ठरत आहेत. 

हे सारंकाही खरचं सत्य असेल तर ही बाब अत्यंत वाईट आहे, असं मत हृतिकनं इथं नोंदवलं आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा पाठींबा आणि आर्यन खान प्रकरणी होणारे नवे खुलासे पाहता आतातरी किंग खानच्या लेकाची सुटका होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

jagran

अनेक बडे कलाकार या प्रकरणावर त्यांची मतं मांडू लागले आहेत. यामध्ये आता हृतिक रोशनच्या नावाचाही समावेश झाला आहे.