मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा मजूमदारने गळफास घेवून आत्महत्या केल्यानंतर बांग्ला अभिनेत्री मंजूषा नियोगी (Manjusha Neogi) ने आत्महत्या केली आहे. उभरती मॉडेल आणि अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातमीने बंगाली मनोरंजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. राहत्या घरात मंजूषाने आत्महत्या केल्यामुळे कलाविश्वासह चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. गेल्या 15 दिवसांच बंगाली मनोरंजन इंडस्ट्रीतील तिसऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्यामुळे एकचं खळबळ माजली आहे.
राहत्या घरात मंजूषाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. बिदिशा डेची मैत्रिण आणि अभिनेत्री मंजुषा नियोगी हिचं शुक्रवारी निधन झालं. मंजुषाचा मृतदेह तिच्या फ्लॅटवर लटकलेल्या आवस्थेत आढळला
बेडरुममध्ये मिळाला मृतदेह
शुक्रवारी सकाळी मंजुषाचे आई-वडील मुलीला सतत फोन करत होते. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मुलीच्या बेडरूममध्ये पाहिले, तेव्हा मुलीचा मृतदेह त्यांच्या फासावर लटकलेला दिसला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मंजूषाची मैत्रिण बिदिशाने बॉयफ्रेंडमुळे संपवलं जीवन
बिदिशाच्या मित्रांच्या मित्रांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाची जवळची मैत्रीण दिया दास हिने सांगितलं, ती डिप्रेशनमध्ये होती.
बिदिशाचा बॉयफ्रेंड Anubhab याच्या आणखी 3 मैत्रिणी होत्या. बिदिशाला बॉयफ्रेंडचं इतर मुलींसोबत असलेलं नातं मान्य नव्हतं. या प्रकरणामुळे ती डिप्रेशनमध्ये होती.
बिदिशानंतर लगेच दोन दिवसांत मंजूशाने आत्महत्या केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बिदिशा आणि मंजूषाच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.