एखाद्या टॉप स्टारला ही लाजवेल, असं आहे Bharti Singh चं आलिशान घर

लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Updated: Feb 5, 2022, 02:27 PM IST
 एखाद्या टॉप स्टारला ही लाजवेल, असं आहे Bharti Singh चं आलिशान घर title=

 मुंबई : सेलेब्सबद्दलची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यांचे घर कसे असेल हे पाहण्यासाठी ही चाहते उत्साहात असतात. नुकताच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओद्वारे भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. 

भारती सिंगने घराच्या आतला व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीने चाहत्यांना तिच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याची ओळख करून दिली. यासोबतच भारतीने तिच्या जवळच्या मित्रांचे फोटोही दाखवले ज्यांच्यासोबत हर्ष आणि भारती अनेकदा पार्टी करत असत.

या व्हिडिओमध्ये भारतीने किचनपासून लिव्हिंग रूमपर्यंत आणि लिव्हिंग रूमपासून बेडरूमपर्यंत घराचा प्रत्येक छोटा कोपरा दाखवला आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकजण म्हणत आहेत, की भारती आणि हर्षने त्यांचे घर किती छान सजवले आहे. वेलकम होम टूर या नावाने भारतीने हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. आतापर्यंत 122 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.