बंधनं असूनही गरोदर भारतीची करामत; Video व्हायरल

बंधनं असूनही गरोदर भारतीची करामत; Video व्हायरल   

Updated: Dec 21, 2021, 11:59 AM IST
बंधनं असूनही गरोदर भारतीची करामत; Video व्हायरल  title=

मुंबई : यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. आता कॉमेडियन भारती सिंह देखील चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे. भारती लवकरचं आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी भारतीने प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. तिने एक व्हिडीओ शेअर करत आई होणार म्हणून तिची प्रतिक्रिया काय होती सांगितलं. आता पुन्हा तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

व्हिडीओमध्ये ती बेबी बम्प फ्लॉट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती ड्रेस बदलताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'मी आई होणार आहे आणि  मी आई होण्याचा आनंद घेत आहे.' असं लिहिलं. तिचा हा व्हिडीओ सध्या  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारतीच्या गर्भधारणेला पाच महिने पूर्ण झाले आहेत. भराती एप्रिलमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे. भारतीने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. भारती सिंह सांगते की, सुरुवातीच्या काळात तिच्या कुटुंबाने प्रेग्नेंसीबद्दल कोणालाही काहीही सांगण्याचं बंधन घातलं. 

त्यामुळे चार महिने पूर्ण झाल्यानंतर तिने सर्वांना आनंदाची बातमी दिली. भारतीचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. आता भरती आणि पती त्यांच्या बाळाच्या प्रतीक्षेत आहे.