मुली समजायच्या Single; बॉलिवूडच्या हँडसम हंक अभिनेत्यानं दिली बाबा झाल्याची बातमी

Female Fans च्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्यानं ही पोस्ट करत अनेकांनाच थक्क केलं. 

Updated: Aug 27, 2021, 05:58 PM IST
मुली समजायच्या Single; बॉलिवूडच्या हँडसम हंक अभिनेत्यानं दिली बाबा झाल्याची बातमी  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) काही कलाकार हे कोणाचाही वरदहस्त नसतानाही आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. असाच एक अभिनेता काही वर्षांपूर्वी या कला जगतात आला आणि त्यानं आपली वेगळी शैली तयार करत त्याच बळावर प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. 

विविध चित्रपटांमध्ये त्याला सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका मिळाल्या, पण त्यासुद्धा त्यानं तितक्याच ताकदीनं साकरल्या आणि चित्रपटांमध्ये आपली दमदार छाप सोडली. असा हा अभिनेता सूत्रसंचालक म्हणूनही तितकाच प्रभावी ठरला. त्याच्या रुपावर तरुणी भाळल्या आणि अनेकिंनी तर या अभिनेत्याचे फोटो मोबाईल वॉलपेपरवरही ठेवले. 

तरुणी या अभिनेत्यावर अक्षरश: जीव ओवाळून टाकतात. हे सारंकाही खरं असलं तरीही आता मात्र या अभिनेत्यानं या Female Fans ची मनं तोडली आहेत. कारण अजूनही हा अभिनेता सिंगल आहे असंच त्याच्या महिला चाहत्यांना वाटत होतं. अशातच त्यानं आपण बाबा झाल्याची बातमी दिली. या अभिनेत्यानं या फॅन्सची मनं तोडली असली तरीही याच चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. कारणंही तसंच आहे. त्याच्या आयुष्यात एका चिमुकलीची एन्ट्री झाली आहे. 

सप्तपदी वगैरे ठीक; या नवरा- नवरीनं लग्नाच्या स्टेजवरच मारले Push Ups; पाहा भन्नाट व्हिडीओ 

लेकिच्या जन्माची बातमी सांगत तिचं नावही जाहीर करणारा हा Handsome Hunk अभिनेता आहे, अपारशक्ती खुराना. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यानं ही गोड बातमी दिली. अरजोई खुरानाचं आम्ही, अपारशक्ती आणि आक्रिती (Aparshakti Khurana) (Aakriti Ahuja)स्वागत करतो, असं या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं. 

खुराना कुटुंबामध्ये या गोड बातमीमुळं सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अपारशक्तीच्या मुलीच्या जन्मामुळं अभिनेता आयुष्मान खुराना हा काका झाला आहे, त्यामुळं कलाकारांनी त्याच्यावरही शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.