कोरोना व्हायरसचा बॉलिवूड अभिनेत्याला असाही फटका

कोरोना व्हायरसच्या रूग्णात दिवसेंदिवस वाढ 

Updated: Feb 9, 2020, 11:24 AM IST
कोरोना व्हायरसचा बॉलिवूड अभिनेत्याला असाही फटका  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट  यांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना आणखी एका बॉलिवूड कलाकाराच्या लग्नाची तारीख ठरली आहे. अभिनेता वरूण धवन देखील लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 

वरूण धवन खूप दिवसांपासून नताश दलालला डेट करत होते. याता या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. वरूण आणि नताशा दोघं बालपणापासूनचे मित्र आहेत. दोघं अनेकदा पार्टीमध्ये दिसले आहेत. नुकतेच हे कपल अरमान जैनच्या लग्नात रोमँटिक अंदाजात दिसले. या दोघांच्याही लग्नाची तारिख ठरली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by varun Natasha lovers (@varun_natasha_lovers) on

मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे 2020 रोजी थायलंडमधील JW Marriott Khao Lak Resort & Spa मध्ये लग्न करणार आहे. पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या लग्नाचं स्थळ बदलणार असल्याची देखील चर्चा आहे.  थायलंडमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यामुळे स्थळ बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pyaar tera delhi ki sardi  #3 days for streetdancer3d

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा आहेत. यातच लग्नाची तारीख ठरल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. या लग्नात करण जोहर महत्वाची भूमिका साकारणार आहे. वरुण आणि नताशाच्या लग्नाची तयारही सुरु झाली आहे. दोघांनी आपल्या संगीतसाठी ड्रेस आणि ज्वेलरीही फायनल केली आहे. या दोघांचे लग्न एका प्रायव्हेट हॉलमध्ये होणार आहे. जिथे जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोकांचा समावेश असेल.