मुंबई : हिंदी सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसर येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीवर जवळपास चार दशके जितेंद्रने यांनी राज्य केले. जितेंद्रचे खरे नाव रवी कपूर आहे. 1974 मध्ये त्यांनी त्यांची मैत्रीण शोभा कपूरसोबत लग्न केले. फार कमी लोकांना माहिती आहे की, जीतेंद्र हे हेमा मालिनीचे नेहमीच जवळचा मित्र होता. त्यांना एकता कपूर आणि तुषार कपूर ही दोन मुलं आहेत. आज, जीतेंद्रच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्य़ांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगणार आहोत
हेमा मालिनी यांना जीतेंद्रशिवाय धर्मेंद्र आणि संजीव कुमारदेखील पसंत करायचे. आणि तिच्यासोबत यांना लग्न करायची अशी इच्छा होती. 'दुल्हन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र आणि हेमा यांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. असे म्हणतात.
शूटिंग संपल्यानंतर जीतेंद्र आपल्या पालकांसह हेमाच्या घरी पोहोचले. दरम्यान, अशी बातमीही मिळाली होती की, जितेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते दोघंही यावेळी चेन्नईमध्ये होते. तथापि, त्यावेळी जीतेंद्र त्यांची पत्नी शोभा कपूरसोबत नात्यात होते.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भातील एक बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापली होती. ही बातमी वाचून धर्मेंद्र पूर्णपणे हादरले होते. त्यांनी ताबडतोब जितेंद्रची पत्नी शोभा कपूर यांच्याकडे धाव घेतली. हे लग्न थांबवण्यासाठी दोघेही चेन्नईला रवाना झाले. मग काय, हेमाशी लग्न करण्याचं जितेंद्रचे स्वप्न अधूरच राहिलं. त्यानंतर जितेंद्रने 1976 मध्ये गर्लफ्रेंन्ड शोभाशी लग्न केले. ही वेगळी बाब आहे की नंतर धर्मेंद्रने हेमासोबत दुसरं लग्न केलं.
एकदा एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारले गेले होते की, त्यांनी हेमाला कधी प्रपोज केले आहे का? यावर जितेंद्र म्हणाले, 'मला माझ्या आयुष्यातील त्या विषयावर बोलायचं नाही. त्यांची मुलं मोठी झाली आहेत आणि माझीसुद्धा. याबद्दल आता बोलणे आश्चर्यकारक आणि लाजिरवाणे ठरेल. '
सुमारे 200 चित्रपटात काम केलेल्या जितेंद्रला चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनी चित्रपटात पहिला ब्रेक दिला होता. १९६४ मध्ये आलेल्या 'गीत गया पत्थरोन ने' असं या चित्रपटाचे नाव होतं. जितेंद्रने आपल्या करिअरमध्ये 'जीने की रहा', 'मेरे हुजूर', 'फर्ज', 'हमजोली', 'कारवां', 'धर्मवीर', 'परिचय', 'खुशबू', 'तोहफा' आणि 'हिम्मतवाला' यासारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे