'एक एक आमदार की कीमत...', पंकजा मुंडेंचा फिल्मी अंदाज आला समोर

पंकजा मुंडेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 12, 2022, 03:00 PM IST
'एक एक आमदार की कीमत...', पंकजा मुंडेंचा फिल्मी अंदाज आला समोर title=

मुंबई : झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली आहे. त्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी पंकजा ताईंचा फिल्मी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. 

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

प्रेक्षक महिलांपैकी एका महिलेनं पंकजा ताईंना चित्रपटातील एक डायलॉग देत तो एका वेगळ्या अंदाजात बोलायला सांगतात. ती महिला आधी पंकजा ताईंना सांगते की एक फेमस डायलॉग आहे. 'एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू हा डायलॉग आपण तुमच्यासाठी बदलू 'एक एक आमदार की कीमत तुम क्या जानो सुबोध बाबू.' असं म्हणायला सांगतात, हे ऐकल्यानंतर पंकजा ताई हसू लागतात.

आणखी वाचा : 'हर हर शंभू' फेम फरमानी नाझच गाणं Youtube वरून हटवण्याचं कारण समोर, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

त्यानंतर त्या हा मजेशीर डायलॉग त्यांच्या अंदाजात बोलतात. पंकजा ताईंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याआधी पंकजा ताईंनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसाच्या काही आठवणी शेअर केल्या. तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रश्नाचं उत्तर देताना पंकजा हसत म्हणाल्या, 'अजिबात नाही. तो सुखद क्षण मला अनुभवताच आला नाही.' पंकजा यांनी दिलेल्या या उत्तराने तिथे उपस्थितीत असलेले सगळे लोक हसू लागले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे.' यावर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.

आणखी वाचा : 'तू तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारल्यास, पण...', कियारा अडवाणीची सिद्धार्थ मल्होत्रासाठीची Cryptic Post चर्चेत

पुढे पंकजा यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांविषयी विचारण्यात आला, तेव्हा त्या भन्नाट उत्तर देत म्हणाल्या, 'माझ्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये मुंडे साहेब गृहमंत्री होते. त्यांच्याबरोबर सुरक्षारक्षक असायचे. त्याचबरोबरीने माझ्याबरोबरही तेव्हा सुरक्षारक्षक होते. त्यामुळे मला कॉलेजच्या दिवसांची मजा घेताच आली नाही. सुरक्षारक्षक बघूनच लोक घाबरायचे. पण एकदा कोणाशी मैत्री झाली की ती शेवटपर्यंत असायची.'