'चिडियाघर' च्या मयूरीने घटविले १३ किलो वजन

 २४ वर्षीय शफाक तिच्या गोलूमोलू लुकसाठी ओळखली जात होती. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 25, 2017, 09:12 PM IST
'चिडियाघर' च्या मयूरीने घटविले १३ किलो वजन  title=

नवी दिल्ली : लामलाईटमध्ये राहणारे स्टार्स स्वत: ला आकर्षक ठेवण्यासाठी वजनांकडे विशेष लक्ष देतात. 'चि़डियाघर', 'महाभारत' आणि 'सपना बाबुल का ... बिदाई' यासारख्या सिरिअल्स तसेच 'गेस्ट इन लंडन' सिनेमात दिसलेली शफाफ नाज सध्या चर्चेत आहे. तिने आपल्या नव्या लूकने चाहत्यांना पाहून थक्क करुन सोडले आहे. २४ वर्षीय शफाक तिच्या गोलूमोलू लुकसाठी ओळखली जात होती. 

गेल्या दोन महिन्यांत तिने १३ किलो वजन कमी केले आहे.त्यामूळे तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये तिने हटके लूकमध्ये दिसणार आहे. इतकेच नव्हे, तर तिने नवा लूक दाखविण्यासाठी खास बिकिनी फोटो शूट केले आहे.

 

Be you the world will adjust 

A post shared by Shafaq Naaz (@shafaqnaaz777) on

याबद्दल ती म्हणते, "मी माझ्या कामातून ब्रेक घेऊन वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. स्ट्रिक्ट डाएट आणि नियमित व्यायामावर लक्ष दिले.

 

The best is yet to come .. pic courtesy @krutikaim

A post shared by Shafaq Naaz (@shafaqnaaz777) on

स्वत: मध्ये बदल झालेला पाहताना मला खूप आनंद होत आहे. पुढच्या प्रोजेक्टमध्ये स्वतःला पूर्णपणे नव्या लूकमध्ये पाहण्यास मी उत्सुक आहे. चाहत्यांनाही माझा ही नवा लूक आवडेली अशी आशा तिने व्यक्त केली आहे.