मुंबई : आगामी सिनेमा बह्मास्त्र आणि अफेअर या दोघींमुळे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही सध्या चर्चेत आहेत. या दोघांनीही आपल्या नात्याचा कबुली दिल्यानंतर याबद्दल आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. रणबीर-आलियाच्या अफेअरची खबर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणला आधीपासूनच होती. रिपोर्ट्सनुसार, या नात्याला सुरुवात करताच आलियाने दीपिकाला याबद्दल सर्व काही सांगितले होते.
रणबीर-आलियाच्या नात्याची सुरुवातच बह्मास्त्र सिनेमाच्या सेटवर झाली. सुरुवातीला दोघेही या नात्याची कबुली देत नव्हते. पण जीक्यू मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने या नात्याची कबुली तर दिलीच. पण त्याचबरोबर आलियाच्या एका खास मैत्रिणीला याची माहिती आधीपासूनच असल्याचे सांगितले.
रणबीर दीपिकाच्या एका कॉमन फ्रेंडचे म्हणणे आहे की, ब्रेकअपनंतर दोघेही खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि एकमेकांसोबत ते खूप सारे सीक्रेट्स शेअर करतात.
रणबीर पुढे म्हणाला की, रणबीरने दीपिकाला आलियासोबतच्या नात्याबद्दल सांगितले असता ती देखील खूप खूश झाली.
आलिया-रणबीर लवकरच ब्रह्मास्त्र सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्स करत आहेत. तर दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. या सिनेमाबद्दल बोलताना अयान म्हणाला की, आता मी याबद्दल काही जास्त बोलू शकत नाही. पण हा आधुनिक काळातील सिनेमा आहे.