लोकप्रिय दिग्दर्शक Prakash Jha यांना पितृशोक

Prakash Jha : प्रकाश झा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. अशात त्यांनी सोशल मेसेज देणारे चित्रपट प्रेक्षकांना दिले. दरम्यान, आता प्रकाश झा यांच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 26, 2023, 02:06 PM IST
लोकप्रिय दिग्दर्शक Prakash Jha यांना पितृशोक title=
(Photo Credit : Social Media)

Prakash Jha : लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता प्रकाश झा यांचे वडील तेजनाथ झा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेजनाथ यांनी पाटणाच्या जय प्रकाश नगर येथे स्थित असलेल्या घरी अखेरचा श्वास घेतला. तर गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ही देण्यात आला. पण रात्री त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याआधीच त्यांनी प्राण त्यागले. तेजनाथ यांच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

वडिलांच्या निधनाची बातमी मिळतात प्रकाश झा त्यांच्या कुटुंबासोबत पटनाला निघाले. पटनामध्ये त्यांच्या वडिलांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहे. पाटणाच्या बांसघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. तर प्रकाश झा हे घरातील मोठा मुलगा असून तेच त्यांच्या वडिलांच्या पार्थीवाला अग्नी देतील. प्रकाश झा यांचे वडील तेजनाथ झा हे सरकारच्या कल्याण विभागातील शासकिय अधिकारी होते. पूर्व तुर्हापट्टीचे सरपंच चंद्रशेखर तिवारी यांनी सांगितले की, पाटणा येथील बनसाघाट येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हेही वाचा : Shah Rukh Khan काम, कोरोना काळात झाली नर्स त्यानंतर अभिनेत्रीला पॅरालिसिसचा झटका, आज 'ती' अशी दिसतेय

तेजनाथ झा हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याचे माहिती समोर आली आहे. तर त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा प्रभात झा राहते होते. त्यांच्यावर गेल्याकाही दिवसांपासून पाटणाच्या पारस रुग्णालयात उपचार सुरु होते. तर त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी स्वत: तेजनाथ झा यांनी त्यांच्या घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

प्रकाश झा कोण होते माहितीये?

प्रकाश झा हे बंदिश, मृत्युदंड, रजनीती, अपरन, दामुल, गंगाजल, शूल या सुपरहिट हिंदी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक होते. त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय बदलाच्या आशेनं चित्रपट बनवलं. त्यांनी केलेले चित्रपट हे नेहमीच कौतुक करण्याचा विषय ठरले. त्यांचा पहिला चित्रपट 'दामूल' हा होता. या चित्रपटातून त्यांनी ग्रामपंचायत, जमीनदारी, सोने आणि दलित संघर्षाच्या नाडीला स्पर्श केला. यानंतर सामाजिक चिंतेचे चित्रपट बनवले. आज ते एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहे