मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. आर्यनच्या कोठडीत न्यायालयाने 30 ऑक्टबरपर्यंत वाढ केली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर आता अभिनेत्री अनन्या पांडे देखील एनसीबीच्या रडारवर आहे. तिच्या घरी देखील एनसीबीने छापा टाकला आहे. ड्रग्स संदर्भात आर्यन खानसोबत एका व्हॉट्सऍप चॅटमध्ये अनन्याचं नाव समोर आले आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
Ananya Pandey is the biggest fool in the world if she has left any proof after 20 days also.
— KRK (@kamaalrkhan) October 21, 2021
सोशल मीडियावर एका अभिनेत्याने अनन्याला 'बावळट' म्हटलं आहे. अभिनेता कमाल आर खान, अनन्याला बावळट म्हणत म्हणाला, 'अनन्या पांडे जगातील सर्वात मोठी बावळट असेल जर तिने या 20 दिवसांत पुरावे नष्ट केले नसतील तर...' सध्या केआरके हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एवढंच नाही तर केआरकेने कपूर कुटुंबातील मुलगी, नताशा कपूर बद्दल देखील प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला, 'जर अनन्या आणि आर्यन व्हाट्सऍप चॅटिंगमध्ये ड्रग्स संबंधी बोलत असतील आणि असं करणं गुन्हा असेल तर शनाया कपूरला देखील एनसीबी लवकरचं चौकशीसाठी बोलावतील...'
If it’s true that #Aryankhan and #AnanyaPanday were chatting about drugs and it’s a crime, then #Sanayakapoor might be called by #NCB for questioning soon.
— KRK (@kamaalrkhan) October 21, 2021
दरम्यान, NCB च्या समन्सनंतर अनन्या तिचे वडील अभिनेता चंकी पांडे यांच्यासह चौकशीसाठी पोहोचली. 21 ऑक्टोबरला दुपारी अनन्या एनसीबी कार्यालयात पोहोचली. आज देखली एनसीबी कार्यालयात चौकशी होत आहे. अनन्या गुरुवारी जवळपास दोन तासांसाठी एनसीबी कार्यालयात होती.