Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण

Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड

दिक्षा पाटील | Updated: Nov 29, 2024, 11:57 AM IST
Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण title=
(Photo Credit : Social Media)

Shilpa Shetty ED Raid : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड पडली आहे. त्याचं कारण तिचा नवरा राज कुंद्रा ठरला आहे. पॉर्नोग्राफी केस प्रकरणाशी संबंधीत असलेल्या प्रकरणावरून आता ईडीनं त्यांच्या घरी धाड घातली आहे. ही धाड शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझ येथे असलेल्या घरी अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजता पडली. पॉर्नोग्राफी केस प्रकरणात राज कुंद्राला यापूर्वी अटक झाली होती.

रिपोर्ट्सनुसार, पॉर्नोग्राफी प्रकरणात फक्त राज कुंद्रा नाही तर त्याच्यासोबत आणखी काही लोकांचा सहभाग आहे. त्या इतर लोकांच्या घरी देखील तपास सुरु आहे. हा सगळा तपास मोबाईल अॅपच्या मदतीनं पॉर्नोग्राफी कंटेन्ट बनवत तो सगळीकडे सर्कुलेट करण्याबाबत आहे. तर सध्या ईडीनं 15 ठिकाणी ही धाड टाकली आहे. सध्या ईडी जो तपास करत आहे हा मुंबई पोलिसांच्या 2021 चा प्रकरणावर आधारीत आहे. 

क्राइम ब्रांचनं शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस तुरुंगवासात असलेल्या राज कुंद्रानं त्याच्यावर असलेले सगळे आरोप हे खोटे असल्याचे म्हटले होते. जेव्हा एका मुलीनं मुंबईच्या मालवाणी पोलिस ठाण्यात या रॅकेट विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तक्रारीत तिनं म्हटलं होतं की कशा प्रकारे ते लोकांना ओटीटी आणि चित्रपटांमध्ये काम देण्याचं सांगत मुलींना अश्लील फिल्ममद्ये काम करण्यासाठी लाचार करतात. त्यासोबत तिनं सांगितलं की असे अश्लील फिल्म शूट करत मुंबईतील अनेक लोक बक्कळ कमाई करतात. त्यानंतर पोलिसांनी मलाड वेस्ट परिसरात असलेल्या एका बंगल्यात धाड टाकली. हा बंगला भाड्यावर घेतला असून तिथे पॉर्न फिल्मचं शूटिंग सुरु असल्याचं म्हटलं. त्यावेळी छापेमारी करताना बॉलिवूडची एक अभिनेत्री आणि 11 इतर लोकांना अटक करण्यात आली होती. 

पोलिसांना त्यानंतर राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीविषयी माहिती मिळाली. तर पोलिसांना त्याच्या विरोधात कोणतीही अॅक्शन घेण्याआधी पुरावे हवे होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे राज कुंद्राशी संबंधीत बरीच माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला अटक केली होती. त्यात पीडित मुलींचे जबाब, व्हॉट्सअॅप चॅट, अॅपवर असलेले फिल्म आणि राज कुंद्राच्या अश्लील चित्रपटांविषयी संपूर्ण माहिती मिळाली होती.