Sonakshi Sinha - Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता जहीर इकबालने (Zaheer Iqbal) गेल्या महिन्यात लग्न केलं. मुंबईत एका हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. पण सोनाक्षी सिन्हाने दुसऱ्या धर्मात लग्न केल्याने तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. सोनाक्षीने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तीने आपला कमेंट सेक्शन ऑफ केला होता. त्यानंतर सोनाक्षी आणि जहीर इक्बाल हनीमूनला गेले. पण सोशल मीडियावर सातत्याने होणारी टिका आणि टोमण्यांना कंटाळून अखेर सोनाक्षीने मौन सोडलं हे. सोनाक्षीने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे
सोनाक्षीचं सडेतोड उत्तर
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल रोमांटिक हनीमूनवर गेले होते. हनीमूनचं लोकेशन त्यांनी शेअर केलं नाही. पण त्यांनी काही फोटो आपल्या इस्टा अकाऊंटवर शेअर केले होते. आता हनीमूनवरुन परत आल्यानंतर सोनाक्षीने इन्स्टा अकाऊंटवर चार स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. एका स्क्रिनशॉटमध्ये सोनाक्षीने एक मुद्दा मांडला आहे, यात तीने म्हटलंय. 'काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला शाळेत शिकाव्या लागतात'
दुसऱ्या एका स्क्रिनशॉटमध्ये तीने म्हटलंय 'कदाचित तुमच्या विचारांपेक्षा दुसऱ्यांचे विचार वेगळे असू शकतात, तुम्ही आणखी सहनशील होऊन चांगला माणूस होऊ शकता' सोनाक्षी सिन्हाचे स्क्रिन शॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
23 जूनला सोनाक्षी-जहीरचं लग्न
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालचं 23 जूनाल मुंबईत लग्न पार पडलं. या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. सोनाक्षी आणि जहीरने कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर मुंबईतल्या मोठ्या हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. यात बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थि होते. लग्नाच्या आधीपासून सोनाक्षी सिन्हाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
बिहारमध्ये विरोध
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला बिहारमध्ये प्रचंड विरोध झाला. बिहारमध्ये सोनाक्षी आणि इक्बाल यांच्याविरोधात एक पोस्टर लावण्यात आलं होतं. हे पोस्टर हिंदू शिव भवानी सेनेकडून लावण्यात आलं. या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हाला बिहारमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता.