Shahrukh Khan Pathaan: तब्बल 4 वर्षांनंतर बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' (Pathaan) चित्रपटा 25 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. चित्रपटातील त्याचा लूक चांगलाच चर्चेत आहे. शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहतायत. बऱ्याच कालावधीनंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यावर अवतरणार असल्याने चाहते त्याला पाहण्यासाठी आतुर आहेत. पठाण चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग फूल झालं आहे.
शाहरुखचा लूक, त्याची बॉडी, त्याच्या हेअरस्टाईलबद्दल चाहत्यांना आकर्षण आहे. त्यातच त्याने या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं याचीही चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानने या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान अव्वल स्थानावर आहे. सर्वांत श्रीमंत कलाकारांमध्येही तो टॉपवर आहे. पण बऱ्याच जणांना माहित नसेल, ते म्हणजे त्याने पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं होतं.
30 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये डेब्यू
शाहरुख खानच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून झाली. 1992 मध्ये त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली. दिवाना हा पहिला चित्रपट होता, आणि तो सेकंड लीज हिरो होता. पण त्याच्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये छाप उमटवली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. याचा चांगलाच फायदा शाहरुख खानला मिळाला. त्याच वर्षात त्याला एक नाही तर तब्बल चार चित्रपट मिळाले. छोट्या पडद्यावर काम करत असताना बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचं त्यानं स्वप्न पाहिलं होतं, त्यावेळी त्याच्यासाठी मानधन किती मिळतं हो मुद्दा महत्त्वाचा नव्हता.
पहिल्या चित्रपटात किती मानधन?
खरं तर शाहरुख खानला पहिल्यांदा दिल आशना है या चित्रपटासाठी ऑफर मिळाली. पण काही कारणाने हा चित्रपट आलाच नाही. त्यानंतर त्याला दिवाना चित्रपटात संधी मिळाली. या चित्रपटासाठी शाहरुख खानला चार लाख रुपये मिळाले. तर त्याच वर्षी प्रदर्षित झालेल्या राजू बन गया जंटलमन चित्रपटासाठी त्याल केवळ 25 हजार रुपये देण्यात आली.
राजू बन गाय जंटलमन हा चित्रपट चांगला चालला तर आणखी एक लाख रुपये मिळतील असं सांगण्यात आलं, पण चित्रपट हिट झाल्यानंतरही हे पैसे त्याल कधीच मिळाले नाहीत. पण काळ बदलला, शाहरुख खानची नशीबही पालटलं. यशाची एकेक पायरी सर करत शाहरुख बॉलीवूडचा किंग बनला आहे. बॉलिवूडमध्येच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुखचा समावेश होतो.