बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताचा अंघोळ करताना व्हिडिओ शेअर; पाहून चाहत्यांना धक्का

'बाबा निराला'च्या 'सोनिया' म्हणजेच ईशा गुप्ताने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. 

Updated: Jun 12, 2022, 10:46 PM IST
बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताचा अंघोळ करताना व्हिडिओ शेअर; पाहून चाहत्यांना धक्का

मुंबई : आश्रम 3 मध्ये 'बाबा निराला'च्या 'सोनिया' म्हणजेच ईशा गुप्ताने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. ईशाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर  एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ईशा गुप्ता पाण्यातून बाहेर येत असून ती खूपच हॉट दिसत आहे.  

Esha Gupta ने आंघोळ करतानाचा शेअर केला असा व्हिडिओ 
ईशा गुप्ता तिच्या लेटेस्ट वेब सीरिज आश्रम 3 साठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'सोनिया'च्या पात्रातील तिचा बोल्ड अवतार  खूप पसंत केला जात आहे. ईशा गुप्ता देखील इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि दररोज नवीन व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. अलीकडेच ईशाने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती पाण्यातून बाहेर येताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

आंघोळ करताना शेअर केली पोस्ट!
ईशा गुप्ताने पोस्ट केलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये ती पाण्यातून बाहेर पडताना दिसत आहे. हा एक क्लोज-अप व्हिडिओ आहे ज्यामध्ये ती पाण्यात डोळे बंद करुन पडली आहे. व्हिडिओ सुरू होताच, ती पाण्यातून बाहेर येते आणि नंतर तिचे केस फिरवताना बोल्ड एक्सप्रेशन देताना दिसते. संपूर्ण व्हिडिओमध्ये ईशाचे डोळे बंद आहेत आणि ती आंघोळ करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये ईशाने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. तिचा हा व्हिडिओ खूपच बोल्ड आहे. युजर्सना तिची ही बोल्ड स्टाईल चांगलीच आवडत आहे.