मुंबई : बॉलिवूड म्हटलं की, झगमगतं जग, ग्लॅमरस दुनिया... कलाकारांचे महागडे कपडे, ज्वेलरी, त्यांच्या संपूर्ण पेहराव... अशा गोष्टी डोळ्यासमोर उभ्या रहातात. पण आता आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. ज्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. आम्ही बोलत आहोत बॉलिवूड अभिनेत्री स्नेहलता पाटील हिच्या बद्दल. या अभिनेत्रीने तीन वर्षापूर्वी एका ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करुन बॉलिवूड विश्वात खळबल माजवली होती.
पुण्यातील कॅम्प परिसरातील एनआयएबीएम रोडवरील क्लोअर प्लाझा या मॉलमधील एका ज्वेलरीच्या दुकानात ही घटना घडली होती. या दुकानात स्नेहलता दागिने घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने दुकानदाराचं लक्ष नसताना सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्या. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा आहे.
यावेळी तिने दुकानात उपस्थित सेल्समनला अनेक अंगठ्या दाखवण्यास सांगितल्या. अंगठी काढण्यासाठी ती तिजोरीजवळ गेली असता महिलेने अंगठी उचलून आपल्या बॅगेत ठेवली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली होती.
दुकानाच्या व्यवस्थापकाने या प्रकरणाची माहिती कॅम्प पोलिस स्टेशनला दिली आणि महिला पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठून अभिनेत्रीला अटक केली होती. स्नेहलताच्या ताब्यातून दोन अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. स्नेहलताचा दावा केला होता की, तिने तीन बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्याकडे काम नाही, त्यामुळे पैशांसाठी चोरी केल्याचंही तिने यावेळी पोलिसांना सांगितलं.