'गोलमाल अगेन'चे पोस्टर प्रदर्शित...

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचे तीन पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 22, 2017, 10:09 AM IST
'गोलमाल अगेन'चे पोस्टर प्रदर्शित...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचे तीन पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत. हॉरर आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे हे तीनही पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या पोस्टरवरील ‘इस दिवाली लॉजिक नही सिर्फ मॅजिक’ ही टॅगलाईन लक्षवेधक ठरली आहे. रोहितने २००६ मध्ये गोलमालः फन अनलिमिटेड’ तर २००८ मध्ये  ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि २०१० मध्ये ‘गोलमाल ३’ असे ३ सिनेमे प्रदर्शित केले. कॉमेडीने परिपूर्ण असे हे चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. आता रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का ? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 

 

Logic nahi Magic!!!!!  #GolmaalAgain

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

 

#GolmaalAgainTrailerTomorrow

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

 

#GolmaalAgainTrailerTomorrow

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

 

#GolmaalAgainTrailerTomorrow

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

‘रिलायन्स एण्टरटेनमेन्ट’, ‘मंगलमूर्ती फिल्म्स’ आणि ‘रोहित शेट्टी पिक्चर्स’ यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘गोलमाल अगेन’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल.