मुंबई : बॉलीवूडचे दिग्गज बेस गिटार वादक गोरख शर्मा यांचं निधन झालंय. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गोरख रामप्रसाद शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू होते. त्यांना बाबाजी म्हणूनही ओळखलं जायचं.
गोरख शर्मा यांनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षापासून मेन्डोलिन वाजवण्यास सुरवात केली. सुरुवातीच्या काळात ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात मेन्डोलिन वाजवत. तर वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी संगीतकार रवी यांच्या चौदवीका चांद या गाण्याला मेन्डोलिन वाजविलं होतं. जागतिक कीर्तीचे गोरख शर्मा यांनी अनेक अविस्मरणीय गाण्यांना गिटार वादन केलेय.
ते 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल' यांचे मुख्य सहाय्यक होते. त्यांनी आपल्या 1960 ते 2002 मध्ये त्यांनी हजाराहून अधिक गाण्यांसाठी गिटार वादन केलं. तर पाचशेहून अधिक सिनेमात गिटार आणि इतर वाद्य वाजवलीत. 'कर्ज़' या सिनेमातील 'एक हसीना थी, एक दिवाना था' या गाण्याला गिटार गोरख शर्मा यांची होती. आशिकी या सिनेमातील गिटारही गोरख शर्मा यांचीच होती.