कलाविश्वासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

फक्त चित्रपट व्यवसायच नव्हे, तर... 

Updated: Jul 7, 2020, 04:35 PM IST
कलाविश्वासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा करत चित्रपट क्षेत्राविषयी नव्यानं एसओपी जारी करणार असल्याची घोषणा केली. ज्याअंतर्गत कोरोना व्हायरसमुळं थांबलेल्या चित्रपट निर्मिती व्यवसायाला पुन्हा एकदा नव्यानं चालना मिळणार आहे. 

'फिक्की फ्रेम 2020' च्या उदघाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते. जावडेकर यांच्या वक्तव्यानुसार फक्त चित्रपट व्यवसायच नव्हे, तर मालिकांच्या चित्रीकरणालाही चालना दिली जाणार आहे. या साऱ्यामध्ये अर्थातच कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठीची सावधगिरीही बाळगण्यात येणार आहे. 

 

इंसेंटीव्हची घोषणा 

चित्रीकरणासाठी एसओपी जारी करण्यासोबतच जावडेकर यांनी सर्वच निर्मिती संस्थांसाठी इंसेंटीव्हचीही घोषणा केली आहे. 'महामारीची एकंदर परिस्थिती पाहता भारतात चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी एसओपी लागू करण्यात येणार आहे. ज्यामुळं कोरोना व्हायरसमुळं ठप्प झालेल्या मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणात वेग येऊ शकेल. शिवाय सरकार टीव्ही मालिका, चित्रपट निर्मिती , सह निर्मिती, ऍनिमेशन, गेमिंगसह सर्व प्रकारच्या निर्मितीमध्ये इंसेंटीव्हची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे.