मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांचा आज ६२ वाढदिवस आहे. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी कोलकाता येथे झाला.
बालपणापासून त्यांना संगीत क्षेत्राबद्दल खूप आकर्षण असे.
बप्पी दा यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी असून वयाच्य १४ व्या वर्षी त्यांचे पहिले संगीत दिले.
नेहमी सोन्याने मढलेले दिसणाऱ्या बप्पी दा यांच्या गाण्यांची क्रेझ ७०, ८० च्या दशकात जास्त होती.
संगीत क्षेत्रानंतर सोनं हा त्यांच्या जवळचा विषय आहे.
बप्पी लहरींचे लग्न २४ जानेवारी १९७७ ला झाले. पत्नीपेक्षाही त्यांच्याकडे सोने जास्त असल्याचे बोलले जाते. ९० वे दशक बप्पी दां साठी काही खास ठरले नाही.
२०११ मध्ये आलेला 'डर्टी पिक्चर' मधील ऊ ला ला ऊ ला ला..या त्यांच्या गाण्याने हंगामा केला.
हे गाणं आजही लोकांच्या ओठावर असतं.
एवढच नव्हे तर २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीत त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली. पण या निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
बम्बई से आया मेरा दोस्त, आय एम अ डिस्को डान्सर, झूबी-झूबी, याद आ रहा है तेरा प्यार, तम्मा तम्मा लोगे सारखी गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत.
बप्पी दा यांची बहुतेक गाणी किशोर कुमार आणि विजय बेनेडिक्ट यांनी गायली आहेत.