Tina Dabi Wedding Album: आयएएस टीना डाबी आणि प्रदीप गावंडेच्या लग्नाचा अल्बम आला समोर, फोटो पाहून चाहते म्हणाले...

आयएएस अधिकारी टीना डाबी आणि आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे या दोघांचे नुकतेच लग्न पार पडले आहे. 

Updated: Jun 1, 2022, 04:27 PM IST
Tina Dabi Wedding Album: आयएएस टीना डाबी आणि प्रदीप गावंडेच्या लग्नाचा अल्बम आला समोर, फोटो पाहून चाहते म्हणाले... title=

मुंबई : आयएएस अधिकारी टीना डाबी आणि आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे या दोघांचे नुकतेच लग्न पार पडले आहे. अत्यंत आलीशान पद्धतीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात काढण्याते आलेले फोटो आता समोर आले आहेत. या फोटोत टीनाडाबीच्या मेहंदीपासून लग्न आणि रिसेप्शनचे फोटो आहेत.  

आयएएस अधिकारी टीना डाबी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.लग्न आणि रिसेप्शनमधून मुक्त झाल्यानंतर, टीना डाबीने आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाच्या फंक्शनचे फोटो शेअर केले आहेत.

टीना डाबीने 22 एप्रिल रोजी आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत जयपूरमध्ये कुटुंबीय आणि खास नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. यानंतर 24 एप्रिलला टीना आणि प्रदीपने रिसेप्शन पार्टी दिली. यापूर्वी 21 एप्रिल रोजी मेहंदी आणि संगीत विधी झाले होते.

टीना डाबीने फोटो शेअर करताना इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहले की,'शेवटी माझ्या लग्नाचा अल्बम आला आहे! ते अविस्मरणीय दिवस तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना मला आनंद झाला. 

टीना डाबीने 2018 साली आयएएस अधिकारी अतहर खानसोबत लग्न केले, पण दोघांचे हे नाते फार काळ टिकले नाही. 2020 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आणि त्यानंतर टीनाने प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले.

टीना डाबी या राजस्थान केडरच्या 2016 बॅचच्या IAS अधिकारी आहेत, तर प्रदीप गावंडे 2013 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. सध्या टीना डाबी या सह वित्त (कर) सचिव आहेत, तर प्रदीप गावंडे पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालक आहेत.