लाहोरमध्ये 'हा' माणूस जन्मला नसता तर कधी स्टार बनले नसते अमिताभ बच्चन, शाहरुख खान!

Amitabh Bachchan and Shah Rukh Khan : जर लाहोरमधील या व्यक्तीचा कधी जन्म झाला नसता तर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे कधीच मोठे  स्टार झाले नसते. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 21, 2023, 04:56 PM IST
लाहोरमध्ये 'हा' माणूस जन्मला नसता तर कधी स्टार बनले नसते अमिताभ बच्चन, शाहरुख खान! title=
(Photo Credit : Social Media)

Yash Chopra : बॉलिवूडचं नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्या समोर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान येतात. त्या दोघांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. त्या दोघांना स्टार बनवणारी एकच व्यक्ती असून त्यांचा जर लाहोरमध्ये या व्यक्तीचा जन्म कधी झाला नसता तर कधी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे स्टार झालेच नसते. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून यश चोप्रा आहेत. यश चोप्रा यांचे चित्रपट आजच्या पिढीनं पाहिले तरी त्यांच्या पसंतीस उतरतात. यश चोप्रा यांनी आजवर अनेक वेगवेगळे रोमॅन्टिक चित्रपट बनवले. त्यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. आज यश चोप्रा यांची पुण्यतिथी आहे. या निमित्तानं यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 ला सध्या पाकिस्तानत असलेल्या लाहोर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हे तिथेच झाले. त्यानंतर 1945 मध्ये त्यांचं कुटुंब हे पंजाबमधील लुधियाना येथे स्थायिक झाले. तेव्हा शिक्षण घेत असताना यश चोप्रा यांनी दिग्दर्शक नाही तर इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी पुढचं शिक्षण घेण्यासाठी के लंडनलाही देखील जाणार होते. पण त्यांना नशिब दुसरीकडेच घेऊन गेलं. अचानक यश चोप्रा यांना चित्रपट आवडू लागले त्यावर जणू त्यांचे प्रेम झाले. त्यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. मग काय यश चोप्रा तिथून लंडनला न जाता मुंबईला आले. 

भावाकडून शिकलं दिग्दर्शन!

मुंबईत आल्यानंतर यश चोप्रा यांनी त्या काळी दिग्दर्शक आणि निर्माता असलेला त्यांचा भाऊ बलदेव चोप्रासोबत काम केलं. बलदेव यांच्यासोबत त्यांनी वेगवेगळे चित्रपट केले, ज्यात 'वक्त', 'धर्मपुत्र' आणि 'धूल का फूल'. त्यानंतर 1971 मध्ये यश चोप्रा यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आणि त्याचे नाव 'यशराज फिल्म्स' असे ठेवले. 1973 मध्ये 'दाग' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर यश चोप्रा यांनी दीवार हा चित्रपट केला. त्यांचा हा चित्रपट सुपर हिट ठरला आणि पुन्हा एकदा त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर यश चोप्रा हे नाव घराघरात पोहोचलं. 

अमिताभ आणि शाहरुखच्या यशात यश राज यांचा मोठा वाटा

जेव्हा अमिताभ यांच्या करिअरला उतरतीकळा लागली असताना यश चोप्रा यांनी त्यांची साथ दिली. त्याचवेळी यश चोप्रा यांनी अमिताभ यांच्यासाठी ‘मोहब्बतें’ हा चित्रपट बनवला, या चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय शाहरूख खान, ऐश्वर्या राय, उदय चोप्रा, शमिता शेट्टी, किम शर्मा हे कलाकार होते. या चित्रपटातील कलाकारांची एक खास भूमिका असली तरी देखील अमिताभ यांच्या भूमिकेवर ही बातमी सेन्टर्ड होती. यावेळी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताच अमिताभ यांना चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटातील अमिताभ यांना पाहिल्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. 

हेही वाचा : आलियाशी नाही तर 'या' अभिनेत्रीशी रणबीरला करायचं होतं लग्न पण...; स्वत: केला खुलासा

निवृत्तीची घोषणा

2004 मध्ये यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला ‘वीरजारा’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर जेव्हा यश चोप्रा यांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झाले. मात्र, त्यानंतर निवृत्तीचा काळ त्यांना काही आवडत नव्हता. कारण यश चोप्रा हे कथीच शांत बसले नव्हते ते सतत काही ना काही करत असायचे. त्यामुळे जवळपास निवृत्तीच्या घोषणेच्या महिन्याभरात त्यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते ‘जब तक है जान’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘वीरजारा’ आणि ‘जब तक है जान’ या दोनही चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत शाहरुख खानचं होता.