मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अक्षयच्या या चित्रपटाच्या ट्रेलरचं खुद्द इस्त्रोकडूनही कौतुक करण्यात आलं आहे. इस्त्रोने ट्विट करत चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती दर्शवली आहे.
'टीम इस्त्रो ज्याप्रमाणे काम करते, त्याच भावनिकतेने आणि त्याच उत्कटतेने, अतिशय सुंदररित्या चित्रपट साकारला असल्याचं' इस्त्रोने म्हटलं आहे.
#MissionMangalTrailer beautifully shows the glimpses of emotions and passion with which #TeamISRO works
— ISRO (@isro) July 19, 2019
As #ISRO prepares for landmark launch of #Chandrayaan2, #TeamISRO wishes @akshaykumar all the best for #MissionMangal and all his future endeavour
— ISRO (@isro) July 19, 2019
अक्षयनेही इस्त्रोच्या ट्विटवर उत्तर देत, इतकी प्रेरणादायी गोष्ट देण्यासाठी इस्त्रोचे आभार मानले आहेत.
Mission accomplished! Thank you so much for giving us such an inspiring story to tell, it’s been an absolute honour to have had this opportunity and I can say this on behalf of all the actors & team of #MissionMangal https://t.co/UsDlt88I5R
— Akshay Kumar (@akshaykumar) July 19, 2019
'मिशन मंगल' येत्या १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षयसह चित्रपटात विद्या बालन, किर्ती कुल्हारी, तापसी पन्नू, नित्या मेनन, सोनाक्षी सिन्हा आणि शर्मन जोशी हे कलाकारही प्रमुख भूमिका साकारणार आहे. अक्षय या चित्रपटात एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. जगन शक्ती यांनी 'मिशन मंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. १५ ऑगस्टला 'मिशन मंगल' चित्रपटासह जॉनचा 'बाटला हाऊस' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
चांद्रयान - २ आधी १४ जुलै रोजी लॉन्च करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक बिघाडांमुळे त्याचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. आता २२ जुलै रोजी चांद्रयान - २ पुन्हा एकदा लॉन्च करण्यात येणार आहे.