मुंबई : बॉलिवूडचा भिडू म्हणजे अभिनेता जॅकी श्रॉफ. अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारत जॅकीने झगमगत्या विश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एक काळ इंडस्ट्री गाजवणारा अभिनेता आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे सतत जॅकीची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगत असते. नुकताचं जॅकीने प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला हजेरी लावली.
जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळात जॅकी शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेता जॅकी श्रॉफ हे उपस्थितीत होते. यावेळी जॅकी श्रॉफने महाराष्ट्र, मराठी भाषा आणि राज ठाकरे यांच्या बद्दल मोठं वक्तव्य केलं.
जॅकी म्हणाला, 'मला राजनं खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतो. महाराष्ट्रात राहतो तर मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे. मला स्पष्ट बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो.'
जॅकीने राज ठाकरे यांना ट्रेंड चेंजर असं देखील म्हटलं आहे. तो म्हणाला, 'माझा मित्र आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज हा ट्रेंड चेंजर आहे. ते खूप तरुण दिसतात.''
एवढंच नाही, तर जॅकीने यावेळी फिटनेसबद्दल देखील माहिती दिली. यावेळी जॅकीने डॉक्टरांना देवाची उपमा दिली. तो म्हणाला, 'डॉक्टर देवा सारखे असतात. ते आपल्या मुलांचा सांभाल करतात. आपण जसं झाड लावण्यासाठी बी पेरावं लागतो. त्यामुळे फ्राइड फूड जास्त खाणं टाळावं लागतं. श्वासाकडे देखील विशेष लक्ष द्या.'
पुढे जॅकी म्हणाला, 'कॅलरी कमी होत आहे का? हे बघण्यापेक्षा फॅट कमी होत आहे का? हे देखील पाहिलं पाहिजे. हे आपल्याला कोण सांगणार. आम्ही मेतकुट भात खाणारी, आंबा खाणारी माणसं आहोत. स्वत:च्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.' असं देखील जॅकी यावेळी म्हणाला.