मुंबई : जान्हवी कपूरची 'धडक' हा डेब्यू सिनेमा सुपरहिट ठरत आहे. बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यानंतरही धडकने आपला जम धरून ठेवला आहे. आतापर्यंत या सिनेमाने जवळपास 60 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमातील जान्हवीचं काम क्रिटिक्स आणि प्रेक्षकांनी पसंद केलं आहे. आणि आता तिच्या हातात दुसरा सिनेमा देखील आला आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, तिच्याकडे आता कोणताही सिनेमा नाही. पण आताच हाती आलेल्या माहितीनुसार 'धडक' दिग्दर्शक शशांक खानच्या आगामी सिनेमांत त्याने पुन्हा एकदा जान्हवीला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
So proud to announce #RANNBHOOMI ...@ShashankKhaitan and @Varun_dvn take a giant leap in their third offering together! A solid spectacle with a beating heart!!! DIWALI 2020 release! Remaining lead cast to be announced soon! @DharmaMovies @apoorvamehta18 pic.twitter.com/eiDBn9GUbc
— Karan Johar (@karanjohar) February 19, 2018
मिळालेल्या माहितीनुसार, शशांकचा आगामी सिनेमा 'रणभूमि' हा आहे. या सिनेमात शशांक जान्हवीला वरूण धवनसोबत घेत आहे. रणभूमि हा रिवेंज ड्रामा सिनेमा असून दिवाळी 2020 मध्ये रिलीज होणार आहे. फेब्रुवारीत करण जोहरने ट्विटवर वरूण धवन आणि शशांक खेतानसोबतचा एक फोटो शेअर केला होता. आणि या सिनेमाची घोषणा केली आहे. 5 महिन्यानंतर या सिनेमातील अभिनेत्री फायनल करण्यात आली आहे.