जान्हवी कपूरला हवाय असा जोडीदार; पाहा काय म्हणतेय ती 

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड शैलीसाठी ओळखली जाते.

Updated: Jun 24, 2022, 02:32 PM IST
जान्हवी कपूरला हवाय असा जोडीदार; पाहा काय म्हणतेय ती  title=

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड शैलीसाठी ओळखली जाते. धडक या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या जान्हवीने नुकताच तिच्या भावी जोडीदाराबाबत मोठा खुलासा केला आहे. जान्हवी कपूरने सांगितलं आहे की, तिला कशा प्रकारचा नवरा हवा आहे. तसंच तिला त्याच्यामध्ये कोणते गुण पाहायला आवडतात.

जान्हवी कपूरला हा प्रकार आवडतो
अलीकडेच जान्हवी कपूरने तिच्या आगामी 'गुड लक जेरी' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरला तिच्या भावी जोडीदाराबद्दल विचारण्यात आलं. या बद्दल अभिनेत्री उघडपणे म्हणाली की, 'भविष्यात माझ्या पतीमध्ये मला दिसणार्‍या गुणांची यादी खूप मोठी आहे.

माझा जोडीदार  डीसेंट असावा. त्याच्याकडे सर्व काही करण्याची क्षमता असली पाहिजे. तसंच असं काहीतरी असावं जे मला शिकायला मिळायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माझ्यावर खूप प्रेम करणारा असावा. मात्र, या सर्व गोष्टी जान्हवी कपूरने थोडय़ाशा हसत-खेळत मांडल्या.

या सिनेमात दिसणार जान्हवी
खरंतर जान्हवी कपूरच्या आगामी काळातल्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. लवकरच जान्हवी कपूरचा गुड लक जेरी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. यानंतर जान्हवी कपूर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत बावल या चित्रपटात दिसणार आहे. दुसरीकडे, जान्हवी कपूर अभिनेता राजकुमार रावसह मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही दिसणार  आहे. जान्हवी कपूरही सनी कौशलसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.