Jaya Bachchan यांची नातं का झाली नाराज; आजी आणि नात यांच्यात वादाचं कारण काय?

जया बच्चन यांनी या पोडकास्टमध्ये सहभाग दर्शवला होता तेव्हा जया बच्चन यांनी नव्या नंदाबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. 

Updated: Oct 10, 2022, 09:20 PM IST
Jaya Bachchan यांची नातं का झाली नाराज; आजी आणि नात यांच्यात वादाचं कारण काय? title=

Jaya Bachchan Granddaughter: मिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नातं नव्या नंदा आपल्या सोशल मीडिया पेजवरून कायम सक्रिय असते. (Jaya Bachchan and Amitabh Bachchan Grand Daughter) ती तिच्या पेजवरून रोज एक पोडकास्ट चालवते. 'वॉट द हेल नव्या' (What the Hell Navya) असं तिच्या या पोस्टकास्टच नावं आहे. याद्वारे ती नेहमीच नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडत असते. सध्या नव्या नंदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारणंही मात्र तेवढेच वेगळं आहे. (jaya bachchan granddaughter navya nanda upset What is the reason for the argument)

जया बच्चन यांनी या पोडकास्टमध्ये सहभाग दर्शवला होता. तेव्हा जया बच्चन यांनी नव्या नंदाबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. नव्या नंदा आज्जी जया बच्चनवर रागावली होती आणि यामुळे त्या दोघांमध्ये लटकं भांडणं निर्माण झालं होतं. याबद्दल बोलताना जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ''लहानपणी नव्यानं लिपस्टिक लावण्याचा खूपच जास्त हट्ट धरला होता. त्यावेळी मी तिला सांगितलं होतं तू लिपस्टिक नको लावूस. पण तिनं प्रचंड हट्ट धरला आणि मी तिला सांगितलं की तू लिपस्टिक नाही लावू शकत तेव्हा ती फार दुःखी झाली आणि थोडी रागावली.''

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

''लिपस्टिक काढलेली पाहून नव्या म्हणाली की मी सुंदर दिसत नाही त्यावर मला तिला समजावण्यात खूप वेळ गेला. तेवढ्यात आम्ही गाडी थांबवली आणि तिची समजूत काढली.'' हा आपल्या लहानपणीचा किस्सा ऐकून नव्याही आश्चर्यचकित झाली. तिलाही आपल्या या वागण्यावर आश्चर्य वाटले होते. 

यावेळी जया बच्चन यांनी नव्या नंदाबद्दल खुलासा केला की नव्या लहानपणी फार खोटं बोलायची आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून रडायची. नव्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार की नाही यावर सध्या तरी रेड सिग्नल आहे. कारण नव्या बॉलीवूडमध्ये येणार नसल्याच्याही चर्चा आहेत. नव्या स्वतः एक स्टार्टअप चालवते आणि ती एक बिझनेझ वूमन आहे. ती एक ऑनलाईन हेल्थ पोर्टल चालवते. (Navya Nanda Instagram Podcasts)

आणखी वाचा - सगळं ठीक, पण प्रेग्नंन्ट आलियाचं हे चाललंय काय? पाहून तुम्हीही संतापाल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नव्याचा सख्खा भाऊ म्हणजेच अगस्त्या नंदा (Agastya Nanda bollywood Debut) लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.