करण - प्रबळच्या नात्याचा खुलासा, सत्यसमोर

ट्विटरच्या माध्यमातून प्रबळने त्यांच्या नात्याच्या अफवांना पूर्ण विराम दिला आहे.

Updated: May 27, 2019, 09:14 PM IST
करण - प्रबळच्या नात्याचा खुलासा, सत्यसमोर title=

मुंबई : दिग्दर्शक करण जोहरने त्याचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधत प्रसिद्ध डिझायनर प्रबळ गुरूंगने त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतू प्रबळने या सर्व अफवांना पूर्ण विराम दिला आहे. मी आणि करण रिलेशनशिपमध्ये नसल्याचे ट्विट प्रबळने केले आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून प्रबळने त्यांच्या नात्याच्या अफवांना पूर्ण विराम दिला आहे. प्रबळने दोन पानांची नोट पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'मी करणला डेट करत नाही. करण माझा फार चांगला मित्र आहे. आमच्यात फक्त मित्राचे नाते नाही, तर करण माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे.' असे लिहिले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Pyaar Kiya To Darna Kya. Happy birthday KJo.

A post shared by Prabal Rana Gurung (@troublewithprabal) on

त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला. प्रबळने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'प्यार किया तो डरना क्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करण..' असे लिहिले होते. त्याच्या पोस्टवर करणने प्रतिक्रिया दिली होती. 'भावा थोडा स्वत:वर आवर घाल' अशी कमेंट करणने केली होती.