मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर अनेकदा स्टायलिश ड्रेसमध्ये दिसते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या लूकने चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही, पण एकदा करीना कपूरने असा ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे ती खूप नाराज झाली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करीना या ड्रेसमुळे खूपच अस्वस्थ दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वास्तविक, करीना कपूर सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या कार्यक्रमात करीना कपूरसोबत पती सैफ अली खान, सोहा अली खान, शर्मिला टागोर, कुणाल खेमू सहभागी झाले होते.
यादरम्यान करीना कपूरने लाल रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. मात्र, या ड्रेसमुळे तिला खूप त्रासही झाला. संपूर्ण कार्यक्रमात ती Oops Moment ची शिकार झाल्याचं दिसून आलं.
करीनाने ड्रेसचा कट केसांपासून लपवून ठेवला
कार्यक्रमादरम्यान करीना कपूर अस्वस्थ दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बोलत असताना ती वारंवार ड्रेसचा कट केसांनी लपवताना दिसत आहे. इतकंच नाही तर कार्यक्रमाच्या शेवटी, जेव्हा संपूर्ण कुटुंबासह फोटो क्लिक करण्याची वेळ आली, तेव्हा तिने तिच्या ड्रेसचा कट केसांनी लपवण्याचा प्रयत्न केला.
करीना कपूरचे चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर करीना कपूर लवकरच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
हा चित्रपट खूप आधी प्रदर्शित झाला असता पण कोरोनाच्या लाटेमुळे त्यांचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित हॉलिवूड 'द फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. करीना कपूर शेवटची इरफानच्या 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात दिसली होती.