मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या त्यांच्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. करीनाला बॉयकॉटचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा करीना तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी करीनानं भारतीय रेल्वेला आर्थिक लाभ दिल्याचे सांगितले.
कोर्टरूम कॉमेडी 'केस तो बना है' मध्ये दिसलेल्या करीनानं दावा केला की तिचा 2007 साली प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' (Jab We Met) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भारतीय रेल्वेची कमाई वाढली आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित, या चित्रपटात करीनानं गीतच्या भूमिकेत दिसली, एक अतिशय विनोदी आणि बोलकी मुलगी, जी ट्रेनमध्ये शाहिद कपूरच्या म्हणजेच आदित्य कश्यपला भेटते.
चित्रपटाच्या सुरुवातीला सगळ्यात जास्त सीन हे ट्रेन आणि स्टेशनचे आहेत. यात गीत दोन वेळा तिची ट्रेन मीस करते. स्टेशनवर असलेल्या विक्रेत्याकडूनही तिचा छळ होतो आणि भारतीय रेल्वेच्या एका कर्मचाऱ्यासोबत तिचा वादही होतो.
'केस तो बना है'च्या एका एपिसोडमध्ये, करीनानं सांगितलं की तिच्या 'जब वी मेट' या चित्रपटातील गीत या पात्रानं भारतीय रेल्वेचा महसूल वाढवण्यास मदत केली. ती पुढे म्हणाली की, गीतमुळे हॅरम पॅंटच्या विक्रीत देखील वाढ झाली, ही पॅन्ट गीतनं त्या चित्रपटातील रेल्वेत प्रवास करताना परिधान केली होती.
करीनानं गीत विषयी एक गोष्ट सांगत मस्करी केली की, 'माझ्या गीत या पात्रामुळे हॅरम पॅंटची विक्री आणि भारतीय रेल्वेचे उत्पन्न दोन्ही वाढले आहे.' करीनानं चित्रपटातील एक डायलॉगही बोलून दाखवला. 'केस तो बना है'च्या एपिसोडमध्ये वकिलाची भूमिका बजावत असलेले वरूण शर्मा जेव्हा तिला न्यायालयाच्या नियुक्त्यांबाबत अधिक गंभीर होण्यास सांगतात. तेव्हा करीन उत्तर देत बोलते, 'अब तुम मुझे सिखाओ, सिखडी हूँ मैं भटिंडा की, ट्रेन पकडने से लेकर केस जीतने तक।’
'केस तो बना है'मध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) वकील म्हणून, कुशा कपिला न्यायाधीश म्हणून आणि वरुण शर्मा बचाव पक्षाचे वकील म्हणून काम करत आहेत. यात गोपाल दत्त, परितोष त्रिपाठी, मोनिका मूर्ती, संकेत भोसले, सुगंधा मिश्रा आणि सिद्धार्थ सागर हे कॉमेडियन देखील आहेत. करीनाव्यतिरिक्त अनिल कपूर (Anil Kapoor), वरुण धवन (Varun Dhawan) आणि करण जोहर (Karan Johar) अॅमेझॉन मिनी टीव्ही शोमध्ये त्यांच्यावरील 'आरोप'ला सामोरे गेले आहेत.