Kareena Kapoor हातात बादली घेवून कुठे जात होती, कॅमेरात कैद

 बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला दररोज कुठेतरी स्पॉट केलं जातं. 

Updated: Oct 13, 2021, 05:29 PM IST
Kareena Kapoor हातात बादली घेवून कुठे जात होती, कॅमेरात कैद title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला दररोज कुठेतरी स्पॉट केलं जातं. कधी घराबाहेर, कधी शूटिंग करताना. करीना कपूरच्या प्रत्येक फोटोवर चाहते फिदा होतात. पण अलीकडेच करीनाचा असा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूप असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र नेमकं अभिनेत्रीला झालंय तरी काय?

करीनाच्या हातात बकेट आणि मग
करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीची प्रत्येक शैली चाहत्यांना खूप आवडते. तिचे फोटो सोशल मीडियावर जसे येतात तसे लगेच लोकं त्यांना व्हायरल करतात. अलीकडेच करीनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात ती बकेट आणि मग घेऊन जाताना दिसत आहे. पण करीनाचे फोटो काळजीपूर्वक पहा, मग तुम्हाला फोटोमागचं सत्य कळेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करीनाचा स्वॅग
या फोटोत करीनाने हातात कॉफीचा मग पकडला आहे. पण तिच्या मागे उभी असलेली व्यक्ती एक बादली आणि मग घेवून उभी आहे. फोटो अशा प्रकारे काढण्यात आले आहेत की, अभिनेत्री हातात कॉफीचा मग घेवून उभी आहे असं दिसतंय. अभिनेत्रीचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. यादरम्यान करीना कपूर जीन्स शर्ट घालून कॅज्युअल लुकमध्ये दिसतेय. त्याचवेळी तिच्या डोळ्यांवर काळा चष्मा आणि हातात कॉफीचा मग तिच्या स्वॅगला अनेक पटीने वाढवत आहेत. यादरम्यान करीना खूप फ्रेश मूडमध्ये दिसली. करीना सतत अनेक जाहिराती आणि फॅशन ट्रेंडवर काम करत आहे.