मुंबई : तैमूरच्या जन्मानंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी करिना कपूर-खान पुष्कळ मेहनत घेत आहे. प्रसूतीनंतर काही महिन्यांत ती पूर्ववत होऊन आपल्यासमोर आली. सध्या ती ‘वीरे दी वेडिंग’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र चित्रपटासाठी ती खूप व्यायाम करत असल्याचे समजतंय. त्यामुळे करिना पुन्हा झिरो फिगरमध्ये दिसणार की काय ? अशा चर्चा रंगल्या आहेत.
नव्या लूकसाठी अपेक्षित फिगर मिळवण्यासाठी करिना तब्बल दहा तास व्यायाम करत आहे. या चित्रपटात करिना दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्यातील एका लूकमध्ये ती अतिशय बारीक तर दुसऱ्या लूकमध्ये जाड दिसणार आहे. यासाठी तिने हा व्यायामाचा घाट घातला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. करिनानं तिच्या वेळापत्रकात अधिक तीव्रतेचा व्यायाम आणि पिलाटेजचा समावेश केला आहे. त्याचबरोबर ती कडक डाएट देखील करणार आहे.