Kirti Kulhari on Intimate scenes : बॉलिवूडमध्ये आता इंटिमेट सीन (Intimate scenes) कॉमन आहेत. अनेक आभिनेत्री मर्यादा ओलांडून आणि सिनेमाच्या कथेसाठी इंटिमेट आणि किसींग सीन देण्यास मागे पाहिलं नाही. अशाच अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari). किर्ती सध्या 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please!) सीरिजमुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीने सेल्फ लव्ह आणि इंटिमेट सीनबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. (Kirti Kulhari on Intimate scenes)
सेल्फ लव्हवर किर्ती म्हणाली...
किर्तीने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या जीवनातील अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर केल्या. अभिनेत्री म्हणाली, 'मी आतापर्यंत फक्त आणि फक्त अन्य एखादी व्यक्ती माझ्यावर प्रेम करेल (self love) या प्रतीक्षेत असायची, पण पहिल्यांदा जेव्हा मी स्वतःवर प्रेम करायला शिकली तेव्हा मला अधिक आनंद झाला.' (love from another person)
पुढे अभिनेत्री म्हणाली, ''फोर मोअर शॉट्स प्लीज' वेबसिरीजमधील तिच्या पात्राशी जुळवून घेण्याचं आणि पुनर्विवाहाच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे धाडस मला पहिला पती साहिल सहगलने दिलं.' (kirti kulhari intimate scenes)
'मी स्वतःला गंभीर अभिनेत्री समजते. माझ्या भूमिकेला मला योग्य न्याय द्यायचा असेल तर मी त्यासाठी कायम तयार असते. मी 2006 साली लग्न केलं आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो माझ्या पहिल्या पतीने मला पूर्ण पाठिंबा दिला.. त्याने मला कायम प्रोत्साहित केलं...' (kirti kulhari four more shots please!)
इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली...
'तू इंटिमेट सीन, किसिंग सीन करु नको... असं कधीही सांगितलं. किसिंग आणि इंटिमेट सीन आपल्या इंडस्ट्रीमध्ये साधारण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माझे सेक्स सीन कमी झाले आहेत. मला आता इंटिमेट सीन माझ्यासाठी साधारण झालं आहेत.' असं देखील अभिनेत्री म्हणाली. (kirti kulhari husband)
'फोर मोअर शॉट्स प्लीज'
'फोर मोअर शॉट्स प्लीज' सीरिज आधुनिक जीवन जगणाऱ्या चार मुलींभोवती फिरताना दिसत आहे. आज मुली आर्थिक दृष्ट्या पतीवर अवलंबून नाहीत असं सीरिजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.