मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या २५ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात नाना आणि नानींपासून झाली. नानी शीतलबद्दल काळजी व्यक्त करीत नानांना म्हणतात उगाच भय्याच्या नादाला लागणं बरं नाही तिच्यासाठी. तेव्हा नाना म्हणतात मी समजावतो त्यांना. दरम्यान जयडी भय्यासाहेबांना भेटायला त्यांच्या ऑफिसला जाते. व शीतलच्या विरोधात राहुल्यासह सारे गाव शीतलच्या विरोधात आहे असे सांगते व भय्याला म्हणते आजपासून मी तुमच्या कुठल्याच गोष्टीला विरोध करणार नाही फक्त त्या शीतलचा नायनाट करायचा आहे हे विसरून नका.
तेव्हा भय्या म्हणतो ते तर मी कधीच विसरणार नाही आणि आता गावापुढे शीतलाल नाही वेडी ठरवली तर नावाचा भय्यासाहेब नाही. रात्री भय्या पुन्हा फोन करून शीतलला सावध राहा अशी ताकीद देतो. त्याच्या बोलण्याने शीतल फारच घाबरून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी शीतलला रक्षाबंधन झाले की नाही हे विचारतात आणि सकाळची कामं कुठवर आली याची खबर घेतात. एवढ्यात गावातील काही बायका येऊन पुष्पा मामीला गावात असणाऱ्या मोठ्या कार्यक्रमासाठी बोलवायला येतात आणि सोबत घेऊन जातात. तिकडे भय्यासाहेब आणि गावकरी विक्रमच्या नावाने कमान उभारण्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरु करतात. दरम्यान सारे गावकरी भय्याच्या हातून कमानीचे भूमिपूजन करून घेतात. हे पाहून शीतलला फार दुःख होते. कारण गावकरी भय्याच्या बाजूने जाऊन त्याने रचलेल्या सापळ्यात गुंतत जात असतात. भय्यासाहेबांच्या कारस्थानाला बळी पडलेल्या गावकऱ्यांचा भ्रम शीतल दूर करेल का हे बघण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.