Loksabha election 2024 Aamir Khan : सध्या सगळीकडे 2024 च्या लोक सभा निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या सगळ्यात बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अशी ओळख असणारा आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात आमिर खान एका पार्टीला प्रमोट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आमिर देखील डीपफेकचा शिकार झालाय. यात एका राजकीय पक्षाचा खोटा प्रचार करणारं कॅप्शन वापरुन आमिरचा व्हिडीओ व्हायरल केलाय. याप्रकरणी आमिरने पोलिसांत धाव घेतली आहे.
आमिरनं कॉंग्रेसच्या एका खोट्या जाहिरातीच्या विरोधात मुंबईच्या पोलिसात FIR दाखल केली आहे. या जाहिरातीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI चा वापर करण्यात आला असून आमिरचा एक खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओत भाजपच्या प्रत्येक नागरिकाच्या बॅंकेच्या खात्यात 15 लाख रुपयांच्या वचनावर निशाना साधला आहे. हा एक कथितपणे एआय-जनरेटेड डीप फेक व्हिडीओ आहे. यात आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ च्या 10 वर्षां आधी प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडची क्लिप वापरण्यात आली आहे.
आमिर खानच्या प्रवक्त्यानं एक निवेदन जारी केले असून म्हटले की आमिरनं कायदेशीर कारवाई सुरु केली आहे आणि या प्रकरणात अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. आमिरच्या त्या प्रवक्त्यानं सांगितले की 'आम्हाला ही गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमिर खाननं त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही. आमिरनं मागील अनेक निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या काही अभियानांच्या माध्यमातून जनजागरुकतेच्या अनुषंगानं योगदान दिलं आहे. आमिर खान एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून आम्ही त्याविषयी चिंतेत आहोत.
हेही वाचा : अखेर अकाय- वामिकासोबत भारतात परतली अनुष्का शर्मा
आमिर खानचा प्रवक्ता पुढे म्हणाला की "त्याला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हा एक फेक व्हिडीओ आहे आणि पूर्णपणे खोटा आहे. त्यांनं मुंबईच्या सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार दाखल केली असून सोबचतच या प्रकरणाशी संबंधित विविध अधिकाऱ्यांना हे प्रकरण कळवण्यात आले आहे. आमिर खानला सगळ्या भारतीयांना मतदान करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेचा भाग होण्याचे आवाहन केले आहे."