मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित त्या अभिनेत्रींच्या यादीत येते. ज्यांचं आकर्षण सिने क्षेत्रात वर्षानुवर्षे टिकून आहे. माधुरी दीक्षित तिच्या काळातही लोकांच्या हृदयावर जादू करायची आणि बऱ्याच वर्षांनंतरही तिची ही जादू अजुनही टिकून आहे. माधुरी दीक्षित सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये येते. तुम्हाला माहित आहे का? की एक काळ होता. जेव्हा माधुरीचे एक नव्हे तर सात चित्रपट एकामागून एक फ्लॉप झाले होते. आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षितच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल सांगाणार आहोत.
सात चित्रपट एकामागून एक फ्लॉप झाले
अभिनेत्री माधुरी दीक्षितने 1984 साली 'अबोध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर, 1988 मध्ये तिने अभिनेता अनिल कपूरबरोबर 'तेजाब' या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. असं म्हणतात की, जेव्हा तेजाब हा सुपरहिट चित्रपट रिलीज झाला.
तेव्हा माधुरी परदेशात होती. आपला चित्रपट सुपरहिट झाला आहे याची तिला कल्पना देखील नव्हती. नंतर तिच्या सेक्रेटरीने तिला बोलावून ही गूड न्यूज दिली मात्र माधुरीला त्यांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. कारण 'तेजाब'च्या आधी माधुरीचे 7 चित्रपट फ्लॉप झाले होते. असं म्हणतात.
फुलं विकणार्या मुलांनी पटवून दिलं स्टार असल्याची भावना
असं म्हटले जातं की, माधुरी जेव्हा तिच्या बहिणीच्या घरून परतत होती आणि मुंबई विमानतळावर आली तेव्हा लोक तिला पाहण्यासाठी गर्दी करु लागली. जेव्हा ती तिच्या कारमध्ये बसली आणि आपल्या घराकडे जायला निघाली, तेव्हा तिची कार सिग्नलवर थांबली. कारमध्ये माधुरीला पाहून फुटपाथवर फुलं विकणारी मुलं तिच्याकडे धावत आली आणि तिला विचारलं - "तू मोहीनी आहेस ना?"
माधुरी दीक्षितचा पहिला ऑटोग्राफ
फुटपाथवर फुलं विकणार्या मुलांचं हे शब्द ऐकून माधुरी स्तब्ध झाली. नंतर त्या मुलांनी माधुरीला हातात एक पेपर दिला आणि तिला ऑटोग्राफ देण्यास सांगितला. माधुरीच्या आयुष्यातील हा पहिला ऑटोग्राफ होता जो तिने फुलांची विक्री करणाऱ्या मुलांना दिला. त्यानंतर माधुरीला समजलं की, ती प्रसिद्ध झाली आहे.